Dhule News: महापालिका कर्मचाऱ्यांची आता प्रवेशद्वारात हजेरी; आढळले 72 लेटलतिफ

Dhule Municipal Corporation
Dhule Municipal Corporationesakal

Dhule News : महापालिकेतील कर्मचाऱ्यांना वेळेवर येण्याची शिस्त लागावी, यासाठी त्यांची प्रवेशद्वारावरच हजेरी घेतली जात आहे.

याकामी आस्थापना विभागातील लिपिकाची नियुक्ती झाली आहे. हा लिपिक कोणता कर्मचारी किती वाजता कार्यालयात आला, किती वाजता परत गेला, याची नोंद घेत आहे. (Municipal employees now present at entrance Found 72 Letlatif Dhule News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dhule Municipal Corporation
Jalgaon News: HIV बधितांचे पुनर्वसन प्रशासन करणार : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी वेळेत येत नसल्याच्या तक्रारी होत असल्याने उपायुक्त संगीता नांदुरकर यांनी दोन दिवसांपूर्वी तपासणी मोहीम हाती घेतली.

त्यावेळी ७२ लेटलतिफ आढळले. त्यामुळे महापालिकेत कर्मचारी केव्हा येतात, कार्यालयीन वेळेत किती वेळा बाहेर जातात याची नोंद ठेवण्यासाठी प्रवेशद्वारावर लिपीक नियुक्त केला आहे.

आयुक्तपदाचा पदभार घेतल्यापासून अमिता दगडे-पाटील यांनी शिस्तपालनावर भर दिला आहे. कर्मचाऱ्यांनी वेळेवर कार्यालयात उपस्थित राहावे, ओळखपत्र बाळगावे, अशी सूचना त्यांनी केली आहे. तसेच ७२ कर्मचारी उशिरा आल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

Dhule Municipal Corporation
Rohit Pawar: फडणवीस ‘एसी’त बसून बोलू नका, परिस्थिती पाहा, राजीनामा द्या : आमदार रोहित पवार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com