सासूचा गळा आवळणारी सून कारागृहात रवाना

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मे 2019

घरभाड्याचे पैसे परस्पर पतीने सासूकडे दिल्याचा राग आल्याने सुनेने सासूचा वायरीच्या साहाय्याने गळा आवळल्याची घटना सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास जुन्या जळगावातील भोईवाडा येथे घडली होती. अत्यवस्थ झालेल्या सासूला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्यावर शनिपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत संशयित सुनबाईला आज अटक करून न्यायालयात हजर केले न्यायालयाने तिची कारागृहात रवानगी केली आहे.

जळगाव - घरभाड्याचे पैसे परस्पर पतीने सासूकडे दिल्याचा राग आल्याने सुनेने सासूचा वायरीच्या साहाय्याने गळा आवळल्याची घटना सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास जुन्या जळगावातील भोईवाडा येथे घडली होती. अत्यवस्थ झालेल्या सासूला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्यावर शनिपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत संशयित सुनबाईला आज अटक करून न्यायालयात हजर केले न्यायालयाने तिची कारागृहात रवानगी केली आहे. 

शहरातील जुन्या जळगावातील भोईवाडा येथे जिजाबाई कानिफनाथ कोळी (वय ५०) या मुलगा लक्ष्मण व सून दीपाली यांच्यासह भोईवाडा परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांनी त्यांच्या मालकीचे काही घरे भाडे करारावर दिली आहे.

भाडेकरुंकडून मुलगा लक्ष्मण कोळी याने नेहमीप्रमाणे सोमवारी भाडे गोळा करून आणले. आणलेले पैसे आई जिजाबाईच्या हातात दिले, त्यावरून सासू व सुनेचे कडाक्‍याचे भांडण होऊन सून दीपालीने जिजाबाईला बेदम मारहाण करून वायरने गळा दाबून खुनाचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी अत्यवस्थ जिजाबाईला जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केल्यावर पोलिसांनी तिचा जबाब नोंदवून घेत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी तपासाधिकाऱ्यांनी दीपाली कोळी हिला अटक करून न्या. ए. एस. शेख यांच्या न्यायालयात हजर केले. न्यायालयाने संशयित महिलेची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

सूनबाई दीपाली कोळी ही सहा महिन्यांची गर्भवती असून, कारागृहात पाठविण्यापूर्वी तिची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murderer Attack Crime