Dhule News : महिन्याभरात नगरसेवक आपल्या दारी; भाजपचा उपक्रम!

Nagarsevak aapalya dari scheme for citizen to know work done by BJP corporators dhule news
Nagarsevak aapalya dari scheme for citizen to know work done by BJP corporators dhule newsesakal

धुळे : महापालिकेत एकहाती सत्ता मिळाल्यानंतर भाजपच्या नगरसेवकांनी चार वर्षांत प्रभागांमध्ये निरनिराळी कामे केलीत.

ते रिपोर्ट कार्डव्दारे सादर करण्यासाठी महिन्याभरात ‘नगरसेवक आपल्या दारी’ येतील. (Nagarsevak aapalya dari scheme for citizen to know work done by BJP corporators dhule news)

नंतर भाजपने महापालिका निवडणुकीवेळी दिलेले शब्द, आश्‍वासने पाळली की नाही ते धुळेकरांनी ठरवावे, अशी भूमिका भाजपचे शहर- जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी मांडली. येथील मिल परिसरातील रासकरनगरात आयुष्यमान भारत कार्ड नोंदणीसह वितरणाचा कार्यक्रम नुकताच झाला.

महापौर प्रतिभा चौधरी, श्री. अग्रवाल, महापालिका स्थायी समिती सभापती किरण कुलेवार, महिला व बालकल्याण सभापती सारिका अग्रवाल, नगरसेवक अमोल मासुळे, यशवंत येवलेकर, मनोज गर्दे, सुनील पाटील, अतुल पाटील, किशोर सरगर, सुरेश जाधव, महेश थोरात, विनायक चव्हाण, दादा घालमे आदी उपस्थित होते.

शहर विकासाचा आढावा

श्री. अग्रवाल यांनी भाजपच्या महापालिकेतील सत्ता कालावधीमधील शहर विकासाचा आढावा घेतला. भविष्यात आणखी विकास कामे मार्गी लावली जातील. चार वर्षांत पक्षाच्या नगरसेवकांनी जी काही कामे केली, ती रिपोर्ट कार्डच्या माध्यमातून सादर होण्यासाठी महिन्याभरात नगरसेवक आपल्या दारी हा उपक्रम राबविला जाईल.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

Nagarsevak aapalya dari scheme for citizen to know work done by BJP corporators dhule news
Devendra Fadnavis : तापी महाकाय पुनर्भरण योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता देणार | देवेंद्र फडणवीस

यानंतर धुळेकरांनी भाजपला साथ द्यावी, असे सांगत श्री. अग्रवाल म्हणाले, आयुष्यमान भारत कार्ड उपयुक्त आहे. या योजनेच्या माध्यमातून पाच लाखांपर्यंतच्या खर्चाचे उपचार घेता येऊ शकतात. खासगी रुग्णालयांमध्येही मोफत उपचार मिळू शकतील.

केंद्र सरकारची ही योजना आहे. यात राज्य सरकारच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पातून महात्मा फुले जनआरोग्य योजनेशी निगडित रुग्णांच्या उपचारावरील खर्चाची मर्यादा दीड लाखांवरून पाच लाख रुपये केली आहे. याचाच अर्थ योजनेशी निगडित दहा लाख रुपयांपर्यंतचे उपचार खासगी रुग्णालयातही होऊ शकतील.

नागरिकांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी नगरसेवक अमोल मासुळे यांनी मिल परिसरातील प्रभागात आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी सुरू केली आहे. यात श्रमिक, कष्टकऱ्यांचा समावेश केला जाईल, असे श्री. अग्रवाल म्हणाले. महापौर चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले.

दिग्विजय गाळणकर, अमोल पुकळे, गणेश दशपुते, चंद्रकांत भामरे, अनिल दीक्षित, मनोज शिरूडे, चंदू पाटील, विकी थोरात, भय्या पाटील, मनोज सरगर, किरण डोमाळे, गोपाल रासकर, जितू गलांडे, बबलू सूर्यवंशी, वनराज पाटील, नितीन आखाडे, मुन्ना पाटील, चेतन पाठक, भटू अहिरे, राज अहिरे, नाना पवार, प्रदीप काळे, भुरा रगडे, गोविंदा सोनवणे, रोहित सोनार, महेश चंदनकर, हृतीक वाघ आदींनी संयोजन केले.

Nagarsevak aapalya dari scheme for citizen to know work done by BJP corporators dhule news
Dhule News : वातावरणात बदलाने शेतकऱ्यांची तारांबळ; शेतकऱ्यांचा पीक काढणीला वेग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com