Workers
sakal
नांदगाव: ऊसतोडणीसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी परिसरात गेलेल्या नांदगाव तालुक्यातील ऊसतोड मजुरांवर मिरची तोडल्याच्या आरोपावरून सत्तर ते ऐंशी जणांच्या जमावाने हल्ला करून मारहाण केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत महिलांसह अठरापेक्षा अधिक जण जखमी झाले असून, दोन महिलांनी आपल्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचा आरोप लिखित तक्रारीत केला आहे. ही घटना साधारण चार दिवसांपूर्वी घडली.