Farm Labour Crisis Maharashtra
esakal
नांद्रा (ता. पाचोरा): ऐन खरीप हंगामातील पिके काढण्याची लगबग सुरु असतानाच अतिवृष्टीने शेतकऱ्यांसह शेजमजुरांच्या स्वप्नांची राखरांगोळी केली. यंदा हाताला चांंगले काम मिळून दिवाळीचा सण आनंदात साजरा करता येईल, अशी शेजमजुरांना आशा होती. मात्र, अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याने आता मजुरांना काम मिळणे कठीण झाले आहे. नांद्रा परिसरासह संपूर्ण पाचोरा तालुक्यातील मजुरांना सद्यःस्थितीत रोजगार मिळेनासे झाल्याने अनेक मजूर कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे.