Nandurbar Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज! 6 विधानसभा मतदारसंघांसाठी 84 टेबले कार्यान्वित

Nandurbar News : सहाही विधानसभा मतदारसंघांसाठी मतमोजणीच्या २५ फेऱ्या होणार आहेत. दुपारी चारपर्यंत अंतिम निकाल घोषित होण्याचा अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे.
Lok Sabha Election Voting
Lok Sabha Election Votingesakal

Nandurbar Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी मंगळवारी (ता. ४) येथील वखार महामंडळाच्या गुदामात होणार आहे. त्यासाठी सहाशे कर्माचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, सहा विधानसभा मतदारसंघांच्या मतमोजणीसाठी ८४ टेबले कार्यान्वित करण्यात आली आहेत. सहाही विधानसभा मतदारसंघांसाठी मतमोजणीच्या २५ फेऱ्या होणार आहेत. दुपारी चारपर्यंत अंतिम निकाल घोषित होण्याचा अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. (Nandurbar administration ready for counting of Lok Sabha elections)

नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी चौथ्या टप्प्यात १३ मेस मतदान घेण्यात आले होते. महाराष्ट्रात सर्वाधिक ७०.६८ टक्के मतदान झाले होते. मागील निवडणुकीतही नंदुरबारच्या मतदानाची टक्केवारी राज्यात सर्वाधिक होती. उन्हाची तीव्रता असतानाही मतदानाचा टक्का वाढला आहे.

मतदानानंतर नंदुरबार लोकसभा क्षेत्रातील नंदुरबारसह अक्कलकुवा, तळोदा, नवापूर, शिरपूर व साक्री या सहाही विधानसभा मतदारसंघांतील मतदान यंत्रे येथील वखार महामंडळाच्या गुदामात कडक पोलिस बंदोबस्तात ठेवण्यात आली आहेत. शेवटचे अजून काही टप्पे निवडणुकीचे बाकी होते.

ते १ जूनला संपले. त्यामुळे ४ जूनला मतमोजणी होणार आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील मतदानानंतर तब्बल २१ दिवस मतदान यंत्रे २४ तास खडा पहारा ठेवून सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. मतमोजणीची उमेदवार, राजकीय पक्षांसह सर्वसामान्य मतदारांनाही उत्सुकता लागली आहे.

कारण यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे नंदुरबारचा खासदार कोण, याबाबत साऱ्यांनाच उत्सुकता लागली आहे. ती उत्सुकता आता संपणार आहे. मतमोजणीचे काउंटडाउन सुरू झाले आहे. अवघ्या एका दिवसावर मतमोजणी आली आहे. त्यामुळे प्रशासनही सज्ज झाले आहे.

जेथे मतदान यंत्रे ठेवण्यात आली आहेत त्याच वखार महामंडळाच्या गुदामात मंगळवारी (ता. ४) सकाळी आठपासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. मतमोजणी सकाळी आठला सुरू होणार असली, तरी मतमोजणीसाठी नियुक्त कर्मचारी सकाळी सहालाच मतमोजणी केंद्रात दाखल होणार आहेत.

नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी १९ लाख ७० हजार ३२७ पैकी १३ लाख ९२ हजार ६३५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यात सात लाख २३ हजार ९७ पुरुष, तर सहा लाख ६९ हजार ५२८ महिला मतदारांचा समावेश आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी झालेली मतदान टक्केवारी विधानसभा मतदारसंघनिहाय ः

अक्कलकुवा - ७५.०१ टक्के

तळोदा-शहादा - ७१.४९ टक्के

नंदुरबार - ६६.६७ टक्के

नवापूर - ८०.१८ टक्के

साक्री - ६७.६० टक्के

शिरपूर- ६५.०५ टक्के

--------------------------

एकूण मतदान - ७०.६८ टक्के

(latest marathi news)

Lok Sabha Election Voting
Dhule Lok Sabha: मतमोजणीची प्रक्रिया 17 फेऱ्यांत होणार पूर्ण! प्रशासन सज्ज; विधानसभा क्षेत्रनिहाय 20 टेबलांवर होणार मतमोजणी

८४ टेबलांवर २५ फेऱ्यांमध्ये मतमोजणी

सकाळी आठला मतमोजणीला सुरवात होणार असून, सुरवातीला पोस्टल बॅलेट मतमोजणी होणार आहे. यास साधारणतः अर्ध्या तासाचा कालावधी लागण्याची शक्यता असून, त्यानंतर साडेआठपासून विधानसभानिहाय मतमोजणीला सुरवात होणार आहे. एकूण २५ फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार असून, प्रत्येक विधानसभा मतदानसंघासाठी १४ टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे.

प्रत्येक टेबलावर चार अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यामध्ये एक मतमोजणी पर्यवेक्षक, सहाय्यक, एक सूक्ष्म निरीक्षक व एक शिपाई असे चार कर्मचारी असून, एका विधानसभा मतदारसंघासाठी १४ टेबलांवर ८४ कर्मचारी असणार आहेत, असे एकूण ५०४ कर्मचारी नियुक्त असून, याव्यतिरिक्त इतर राखीव असे एकूण ६०० कर्मचारी मतमोजणी प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आले आहेत. दुपारी चारपर्यंत अंतिम निकाल हाती येण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे.

मोबाईल, स्मार्टवॉच बंदी

कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून प्रशासनाने मतमोजणीस्थळी मोबाईल, स्मार्टवॉच यांसह विविध इलेक्ट्रॉनिक साहित्य नेण्यास मनाई करण्यात आली आहे.

उमेदवार प्रतिनिधींसाठी स्वतंत्र कक्ष

उमेदवार प्रतिनिधींसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आहे. त्यात स्क्रीन लावण्यात येणार आहे. दरम्यान, यापूर्वीच संबंधित उमेदवारांना प्रतिनिधींची नेमणूक करण्याच्या सूचना प्रशासनाच्यावतीने देण्यात आल्या असून अनेकांनी त्यानुसार नेमणूक देखील केली आहे. त्याचप्रमाणे प्रसार माध्यमांसाठी देखील स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आहे.

Lok Sabha Election Voting
Baramulla Constituency Lok Sabha Election Result : उमर अब्दुल्लांचं काय होणार? बारामुल्लामध्ये त्रिकोणी लढत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com