Dhule Lok Sabha: मतमोजणीची प्रक्रिया 17 फेऱ्यांत होणार पूर्ण! प्रशासन सज्ज; विधानसभा क्षेत्रनिहाय 20 टेबलांवर होणार मतमोजणी

Jalgaon News : धुळे लोकसभा मतदारसंघाची मतमोजणीची प्रक्रिया सरासरी १७ फेऱ्यांत पूर्ण होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
Arrangement of counting of votes made by the administration at the counting center in the government warehouse in Nagaonbari area.
Arrangement of counting of votes made by the administration at the counting center in the government warehouse in Nagaonbari area.esakal

Dhule Lok Sabha : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ अंतर्गत धुळे लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी (ता. ४) सकाळी आठपासून शासकीय गुदाम (नगावबारी, देवपूर, धुळे) येथे मतमोजणी होणार आहे. मतमोजणीची सर्व तयारी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी कळविले आहे. धुळे लोकसभा मतदारसंघाची मतमोजणीची प्रक्रिया सरासरी १७ फेऱ्यांत पूर्ण होईल, असेही त्यांनी म्हटले आहे. (Dhule Loksabha Counting process will completed in 17 rounds)

धुळे लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी धुळे ग्रामीण, धुळे शहर, शिंदखेडा, मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य व बागलाण या विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी २० अशा एकूण १२० टेबलांवर मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली आहे.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक व मदतनीस म्हणून १४ अधिकारी, १२ रो अधिकारी तर रो अधिकाऱ्यांना सहाय्यक व नियंत्रणासाठी १२ कर्मचारी नियुक्त आहेत. मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी १५ पथकप्रमुख अधिकाऱ्यांची व त्यांना सहाय्यासाठी ५१ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

प्रथम टपाली मतपत्रिका

मतमोजणीच्या सुरवातीस टपाली मतपत्रिकांची मोजणी होईल. त्यानंतर ईव्हीएमची मतमोजणी केली जाईल. टपाली मतपत्रिका मोजणीसाठी १६ टेबले लावण्यात आली आहेत, तर ईव्हीएमच्या मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय २० टेबले आहेत. प्रत्येक टेबलावर चार कर्मचारी असतील. यात पर्यवेक्षक, सहाय्यक, मायक्रो ऑब्झर्व्हहर व एक शिपाई असेल.

अधिकारी-कर्मचारी असे

त्याचबरोबर सुरक्षाकक्ष प्रभारी अधिकारी- ३, नियंत्रण अधिकारी- ६, सहाय्यक अधिकारी- २५, इनकोअरमध्ये माहिती भरण्यासाठी सात नियंत्रण अधिकारी, तर ३२ सहाय्यक अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे. मॅन्युअल एकत्रीकरणासाठी ३४ अधिकारी, तर मॅन्युअल संकलनासाठी नऊ अधिकारी-कर्मचारी.

त्याचप्रमाणे ईटीबीपीएस मतमोजणी, ईटीबीपीएस स्कॅनिंगसाठीही कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणीच्या दिवशी निवडणूक निरीक्षक, मतमोजणी निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी, उमेदवार प्रतिनिधी यांचा समक्ष स्ट्रँग रूम उघडण्यात येईल. (latest marathi news)

Arrangement of counting of votes made by the administration at the counting center in the government warehouse in Nagaonbari area.
Jalgaon Lok Sabha Election: धार्मिक की शहरी-ग्रामीण मतदारांचे ध्रुवीकरण ठरेल वरचढ? अखेरच्या टप्प्यात समीकरण बदलल्याची चर्चा

मतमोजणीच्या फेऱ्या

धुळे लोकसभा मतदारसंघाची मतमोजणीची प्रक्रिया सरासरी १७ फेऱ्यांत पूर्ण होईल. यात धुळे ग्रामीण मतदारसंघासाठी- १९, धुळे शहर- १५, शिंदखेडा- १७, तर मालेगाव बाह्य- १७, मालेगाव मध्यकरिता- १८, तर बागलाण विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीकरिता १५ फेऱ्या होतील.

मतमोजणीची अद्ययावत माहिती भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध होऊ शकेल. मतमोजणी केंद्राबाहेर माध्यम प्रतिनिधींसाठी मीडिया कक्ष, तर उमेदवार व उमेदवारांच्या प्रतिनिधींसाठी कम्युनिकेशन सेंटर तयार करण्यात आले आहेत. मीडिया कक्षात भारत निवडणूक आयोगामार्फत पासेस देण्यात आलेल्या प्रतिनिधींनाच प्रवेश देण्यात येईल.

मोबाईलला मनाई

मतमोजणी केंद्रांत मोबाईलसह इलेक्ट्रॉनिक वस्तू आणण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे मतमोजणी केंद्रात कोणीही मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू आणू नयेत, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांचे मोबाईल ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे, असेही जिल्हाधिकारी गोयल यांनी सांगितले.

Arrangement of counting of votes made by the administration at the counting center in the government warehouse in Nagaonbari area.
Lok Sabha Elections 2024: लोकसभेचा निकाल आता थिएटरमध्ये पाहता येणार, किती असेल तिकीट? जाणून घ्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com