Nandurbar Agriculture: यंदाही तळोदा तालुक्यात कपाशीकडे अधिक कल! सोयाबीनलादेखील मोठी पसंती मिळणार; आता पावसाची प्रतीक्षा

Nandurbar News : तळोदा तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामातील पिकांच्या लागवडीच्या दृष्टीने तयारीला लागला असून, अनेक शेतकऱ्यांनी त्यांचे पिकांच्या लागवडीचे नियोजन पूर्ण केले आहे.
Farm laborers while planting papaya in the field. In the second photograph, while cultivating the farm.
Farm laborers while planting papaya in the field. In the second photograph, while cultivating the farm.esakal

तळोदा : प्रत्येक अस्मानी संकटाला यशस्वीरीत्या तोंड देण्याची सवय झालेला शेतकरीराजा यंदाचा खरीप हंगामासाठी सज्ज झाला आहे. तळोदा तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांची मशागतीची कामे पूर्ण झाली असून, तालुक्यात यंदाही कपाशीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असणार आहे व त्याचबरोबर सोयाबीनलादेखील मोठी पसंती मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना आता पावसाची प्रतीक्षा लागून आहे. (Nandurbar Agriculture More trend towards cotton in Taloda Taluka)

हवामान खात्याने यंदा देशासह नंदुरबार जिल्ह्यात चांगल्या पावसाची शक्यता वर्तविल्याने तळोदा तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामातील पिकांच्या लागवडीच्या दृष्टीने तयारीला लागला असून, अनेक शेतकऱ्यांनी त्यांचे पिकांच्या लागवडीचे नियोजन पूर्ण केले आहे. तळोदा तालुक्यातील २४ हजार ९२० हजार हेक्टर क्षेत्रांवर या वर्षीच्या खरीप हंगामासाठी पेरणीचा लक्ष्यांक निश्चित करण्यात आला आहे.

यात दर वर्षीप्रमाणे या वर्षीही कापसाचे क्षेत्र सर्वाधिक असून, नऊ हजार ६०० हेक्टरचा लक्ष्यांक असताना जवळपास दहा हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. काही शेतकऱ्यांनी कपाशी लागवडीला सुरवातदेखील केली आहे. कपाशीखालोखाल तालुक्यातील शेतकऱ्यांची पसंती उसाला असते. यंदा नऊ हजार ३७० हेक्टर क्षेत्रावर ऊसलागवड होईल, असे म्हटले जात आहे.

तालुक्यात एकेकाळी भुईमूग, सूर्यफूल आदींचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेण्यात येत होते. आता मात्र शेतकरी याऐवजी सोयाबीन लागवडीला पसंती देत असून, दोन हजार ७०० हेक्टरवर सोयाबीन पेरणीचा लक्ष्यांक आहे. ज्वारी, बाजरीच्या लागवडीकडे शेतकरी काही वर्षांपासून पाठ फिरवीत असून, तुलनेने ज्वारी, मका व तांदळाचे क्षेत्र वाढत आहे. एक हजार ६६० हेक्टरवर ज्वारी, २२० हेक्टरवर तांदळाचे, तर ७२५ हेक्टरवर मक्याची लागवड होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, मजुरांची टंचाई या वर्षी कमी भासण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (latest marathi news)

Farm laborers while planting papaya in the field. In the second photograph, while cultivating the farm.
Loksabha 2024 Seating Arrangement: संसदेत कोण कुठे बसणार हे कोण ठरवतं? त्यासाठी काय नियम आहेत?

यामुळे पिकाकडे कल

-तालुक्यात फसाची लागवड मोठ्या प्रमाणावर, ऊस सर्व दृष्टिकोनातून फायदेशीर ठरत असल्याने शेतकऱ्यांचा कल.

-कमी काळात जास्त प्रमाणात पैसे मिळवून देणारे पीक असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर कापसाला पसंती.

-तालुक्यात खरिपातील भुईमूग, सूर्यफूल यांची नगण्य लागवड.

-एकेकाळी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर घेण्यात येणारे खरिपातील बाजरीचे पीक आता फक्त सातपुड्याच्या दुर्गम भागापर्यंत मर्यादित.

खरिपाची २०२३ ची पेरणी व २०२४ चे नियोजनाची आकडेवारी

पीक लक्ष्यांक प्रत्यक्षात अपेक्षित

तांदूळ २५९ २२२ २२२

ज्वारी १,८७७ १,६५० १,६६०

मका १,६०३ ७१५ ७२५

तूर ९८७ ४६१ ४६१

मूग १९६ ५७ ५७

उडीद १३० ५० ५०

सोयाबीन १,७९० २,६०२ २,७००

कपाशी ९,७९८ ९,६२३ ९,६२३

ऊस १०,३१८ ९,३७७ ९,३७७

(वरील सर्व आकडेवारी हेक्टरमध्ये)

"यंदा चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने शेतकरी उत्साहित झाला आहे. शेतात मॉन्सूनपूर्व शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण झाली असून, आता पावसाची प्रतीक्षा आहे. बी-बियाण्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता असते, त्यामुळे प्रशासनाने त्यादृष्टीने दक्षता घ्यावी."- अरुण चव्हाण, शेतकरी, चिनोदा

Farm laborers while planting papaya in the field. In the second photograph, while cultivating the farm.
Nandurbar Political News: निवडणूक लोकसभेची, आडाखे मात्र पालिकेचे! तळोदा येथे पक्षांना मिळालेल्या मतांवरून चर्चांना उधाण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com