African Swine Fever : संसर्ग केंद्रापासून 1 किलोमिटर परिसर बाधित क्षेत्र घोषित

Nandurbar : आफ्रिकन स्वाइ फीव्हर या विषाणूजन्य रोगाचच्या प्रादुर्भावाचा शहादा तालुक्यातील म्हसावद येथील तपासणी निष्कर्ष होकारार्थी आला आहे.
Pig (file photo)
Pig (file photo)esakal

Nandurbar News : आफ्रिकन स्वाइ फीव्हर या विषाणूजन्य रोगाचच्या प्रादुर्भावाचा शहादा तालुक्यातील म्हसावद येथील तपासणी निष्कर्ष होकारार्थी आला आहे. या रोगाचा प्रसार अन्य ठिकाणी होऊ नये म्हणून प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोगप्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ नुसार संसर्ग क्षेत्रापासून एक किलोमीटरचा परिसर बाधित क्षेत्र व दहा किलोमीटर परिघातील क्षेत्र संनियंत्रण क्षेत्र म्हणून म्हणून घोषित केल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा मनीषा खत्री यांनी दिले आहेत. (Nandurbar area 1 kilometer from center of infection declared as affected area)

आफ्रिकन स्वाइन फीव्हर हा विषाणूजन्य रोग पाळीव व जंगली वराहांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरणारा सांसर्गिक रोग असून, त्याचा संसर्ग सर्व वयोगटांतील पाळीव व जंगली वराहांमध्ये होत असतो. या रोगाची लागण किंवा प्रसार बाधित वराहांच्या शरीरातून निघणाऱ्या द्रावण.

दूषित खाद्य व चारा तसेच कीटकांच्या माध्यमांतून इतर वराहांना होते. आफ्रिकन स्वाइन फीव्हर हा विषाणूजन्य रोग वराहांपासून माणसांमध्ये होत नाही, त्यामुळे या रोगापासून मानवी आरोग्यासाठी धोका नाही.

नंदुरबार जिल्ह्यात या विषाणूजन्य रोगाचा पाळीव व जंगली वराहांमध्ये संभाव्य प्रादुर्भावाच्या प्रतिबंधात्मक उपयोजनेसाठी जिल्ह्यातील वराहपालन व्यावसायिक, व्यापारी, वराह मांस विक्री केंद्र (कसाई) व नागरिकांनी आपल्या स्तरावर काटेकोरपणे जैवसुरक्षा प्रणालीचा अवलंबन करावा.

जैवसुरक्षा प्रणालीचा अवलंब करा

बाधित क्षेत्राच्या एक किलोमीटर परिसरातील सर्व वराहांचे किलिंग करून त्यांची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने लावून त्या परिसराचे निर्जंतुकीकरण करावे. (latest marathi news)

Pig (file photo)
Nandurbar News : दिव्यांगांसाठी प्लॅटफॉर्मवर बॅटरी ऑपरेटेड गाड्या देणार : खासदार डॉ. हीना गावित

आफ्रिकन स्वाइन फीव्हर (एएसएफ) रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाधित परिसरात सक्रिय संनिरीक्षण व्यापक प्रमाणावर करावे. सुयोग्य जैवसुरक्षा उपाययोजना कराव्यात. पाळीव तसेच जंगली वराहांतील अनियमित मर्तुकीवर बारकाईने लक्ष ठेवावे.

वराहाच्या मांसाची विक्री करणाऱ्या आस्थापनांची नोंदणी करण्याची प्रक्रिया पूर्ण करून त्या आस्थापनांना स्थानिक पशुवैद्यकांनी नियमितपणे भेटी देऊन नियंत्रण ठेवावे. तसेच मोकाट पद्धतीने होणारे वराहपालन टाळावे.

घरगुती तसेच हॉटेलमध्ये वाया गेलेले, शिल्लक राहिलेले अन्न वराहांना देणे ही याच विषाणूच्या प्रसारास मुख्यत्वे करून कारणीभूत असल्याने अशा प्रकारचे खाद्य देणे टाळणे गरजेचे असून, निरोगी वराहाचे घरगुती व कत्तलखान्यातील कच्चे मांस उपपदार्थ तसेच कचरा यांच्याशी संपर्क येऊ देऊ नये.

वराहपालन केंद्रातील तसेच वराह मांस विक्री केंद्रातील कचरा एकत्रित साठवू नये. सर्व कचरा नष्ट करावा अथवा त्याची सार्वजनिक कचरा व्यवस्थापनाकडून शास्त्रोक्तदृष्ट्या योग्य रीतीने विल्हेवाट लावावी. वराहपालन करणारे पशुपालक वा व्यवसायासंबंधित व्यक्ती यांच्यामध्ये या रोगाविषयी जागरूकता निर्माण करून रोगाच्या प्रादुर्भावाविषयी सूचना देणे व सुप्त संनिरीक्षण करण्यासाठी अवगत करावे.

पशुसंवर्धन विभागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी पोलिस व चेकनाके यांच्याशी समन्वय ठेवून शेजारील राज्यातील वराहाची अनधिकृत प्रवेश होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

Pig (file photo)
Nandurbar Municipality News : नंदुरबार पालिकेच्या 230 कोटींच्या अंदाजपत्रकास मंजुरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com