Nandurbar Constituency Lok Sabha Election Result: महाराष्ट्रात काँग्रेसने खातं उघडलं! नंदूरबारमध्ये गोवाल पाडवी विजयी

Nandurbar Lok Sabha Election final Result 2024 live Congress goval padvi win over bjp heena gavit : कधीकाळी काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या नंदूरबार लोकसभा निवडणुकीकडे सर्व राज्याचे लक्ष लागले होते, अखेर या मतदारसंघात काँग्रेसचे नेते गोवाल पाडवी विजयी झाले आहेत.
Nandurbar Constituency Lok Sabha Election Result
Nandurbar Constituency Lok Sabha Election Result

Nandurbar Lok Sabha Election Result 2024: कधीकाळी काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या नंदूरबार लोकसभा निवडणुकीकडे सर्व राज्याचे लक्ष लागले होते. या मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेसचे नेते गोवाल पाडवी यांचा विजय झाला आहे.

येथे भाजपने डॉ. हीना गावित यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली होती. तर भाजपच्या तगड्या उमेदवार गावित यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसने यावेळी राजकीय क्षेत्रात फारसे परिचीत नसलेले गोवाल पाडवी यांना उमेदवारी दिली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ७०.६८ टक्के मतदान झाले होते.

खासदार हिना गावित यांच्याकडे दहा वर्षाच्या राजकारणाच्या अनुभव तर दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांची कुठलीही राजकीय पार्श्वभूमी राहिलेली नसल्याने या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले. मात्र गोवाल पाडवी यांचे वडील के. सी. पाडवी गेल्या ३० वर्षापासून आमदार म्हणून निवडून येत आहेत. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या मतदारसंघात २००४, २००९ साली काँग्रेसचा खासदार होता, तर २०१४ साली मोदी लाटेत भाजपने काँग्रेसच्या वर्चस्वाला सुरुंग लावला. त्यानंतर २०१४ आणि २०१९ साली हीना गावीत यांना विजय मिळाला होता.

Nandurbar Constituency Lok Sabha Election Result
Nandurbar Lok Sabha Constituency : नंदुरबार लोकसभा मतदारसंघात चालणार कोणाची जादू ?

नंदुरबार लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. ज्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील चार तर धुळे जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदार संघाचा यामध्ये समावेश आहे. यात अक्कलकुवा आणि नवापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत. तर साक्री मतदार संघात शिंदे गटाचा आमदार आणि नंदुरबार, शहादा आणि शिरपूर विधानसभा मतदारसंघ हे भाजपच्या ताब्यात आहेत.

२०१९ ला काय झालं होतं?

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत हीना गावित (भाजप) यांना ६३९१३६ मते मिळाली होती तर काँग्रेसचे के. सी पाडवी हे ५४३५०७ मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. तर सुशील अंतुर्लीकर (वंचित बहुजन आघाडी) यांना २५७०२ मते मिळाली होती. या निवडणुकीत विजयी उमेदवाराचे मताधिक्य ९५६२९ इतके राहिले होते.

Nandurbar Constituency Lok Sabha Election Result
Nandurbar Lok Sabha Constituency : उत्तर महाराष्ट्रात लोकसभेच्या रणांगणात उतरल्या 5 रणरागिणी; 4 भाजपच्या तर एक कॉग्रेसच्या उमेदवार

हे मुद्दे प्रभावी ठरणार

नंदूरबार विधानसभा मतदारसंघात धनगरांना आदिवासीतून आरक्षण, जिल्ह्यातील रोजगार, स्थलांतर, औद्योगिक वसाहतीचा प्रश्न आणि मर्जीतील ठेकेदारांना दिली जाणारी कामे हे मुद्दे महत्वाचे ठरले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com