Nandurbar Crime News : बोगस बियाण्यासह 30 लाखांचा मुद्देमाल जप्त; कृषी विभागाची खापरनजीक मोठी कारवाई

Nandurbar Crime : बोगस एचटीबीटी कापूस बियाणे असल्याची खात्री झाली. या प्रकरणी वाहनचालकावर अक्कलकुवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
Crime
Crime esakal

Nandurbar crime News : गुजरातमधून महाराष्ट्रात बंदी असलेले एचटीबीटी बियाणे विकण्याच्या उद्देशाने येत असल्याची गोपनीय माहिती कृषी विभागाला मिळताच कृषी विभागाने खापर (ता. अक्कलकुवा)नजीक वाहनाची (एमएच १८, बीजा ७४२९) तपासणी केली. त्यात बोगस एचटीबीटी कापूस बियाणे असल्याची खात्री झाली. या प्रकरणी वाहनचालकावर अक्कलकुवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ()

खरीप हंगाम २०२४-२०२५ साठी जिल्ह्यात मुबलक प्रमाणात रासायनिक खते, बियाणे व कीटकनाशके उपलब्ध करून देण्यात आली असून, बोगस बियाणे विक्रीला आळा घालणे, रासायनिक खते, कीटकनाशकांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी जिल्हास्तरावर एक तसेच तालुकास्तरावर एक अशी सात भरारी पथके गठित करण्यात आली आहेत.

त्यानुसार १ मेस दुपारी नंदुरबार येथील कृषी विकास अधिकारी किशोर हडपे, गुणनियंत्रण अधिकारी स्वप्नील शेळके, कृषी अधिकारी प्रकाश खरमाळे, कृषी अधिकारी योगेश हिवराळे व तालुका कृषी अधिकारी नीलेश गढरी, मोहीम अधिकारी सचिन देवरे यांना गुजरातमधून एचटीबीटीची बोगस बियाणे आपल्या राज्यात खापरमार्गे येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. (latest marathi news)

Crime
Nandurbar Crime News : गोवंशाच्या सुटकेसाठी पोलिसांची धडक कारवाई; नंदुरबारमधील चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

त्यानुसार सापळा रचून खापरनजीक बोगस बियाणे वाहतूक करणारा ट्रक पकडला असून, वाहनचालकावर अक्कलकुवा येथे कारवाई करण्यात आली. ही कारवाई विभागातील सर्वांत मोठी या हंगामातील पहिलीच कारवाई असल्याने बोगस कृषी बियाणे विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

या वेळी पथकाला बोगस बोगस बियाण्याची हजार पाकिटे व वाहतूक करणारे वाहन आढळले असून, तीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक स्वप्नील शेळके यांच्या फिर्यादीवरून अक्कलकुवा पोलिस ठाण्यात बियाण्याची उत्पादन करणारे, उत्पादनाचे मालक, वाहतूकदार व जबाबदार व्यक्ती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Crime
Nandurbar Bribe Crime : 50 रुपये घेणे महागात; लाचलुचपतकडून 1 ताब्यात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com