Nandurbar Crime News : बनावट दारूनिर्मिती कारखान्यावर धाड; ‘एलसीबी’ची कारवाई

Nandurbar Crime : उपनगर पोलिस ठाण्यांतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध दारूनिर्मिती करणाऱ्या कारखान्यासह दारूनिर्मितीसाठी लागणाऱ्या साहित्याची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली आहे.
Superintendent of Police Shravan Dutt S., Additional Superintendent of Police Nilesh Tambe, along with fake liquor manufacturing materials and liquor bottles seized by the local crime branch team.
Superintendent of Police Shravan Dutt S., Additional Superintendent of Police Nilesh Tambe, along with fake liquor manufacturing materials and liquor bottles seized by the local crime branch team.esakal

Nandurbar Crime : उपनगर पोलिस ठाण्यांतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध दारूनिर्मिती करणाऱ्या कारखान्यासह दारूनिर्मितीसाठी लागणाऱ्या साहित्याची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून नऊ लाख आठ हजार ६१६ रुपये किमतीच्या दारूसह मुद्देमाल जप्त करण्यात आला. (Nandurbar Crime Fake liquor factory raided Action of LCB)

पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी गुरुवारी (ता. १९) सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेश भदाणे.

पोलिस उपनिरीक्षक मुकेश पवार व कर्मचाऱ्यांच्या पथकाने नंदुरबार शहरातील करण चौफुलीजवळ सकाळी साडेसहाच्या सुमारास पेट्रोलिंगदरम्यान संशयित वाहने तपासत असताना तळोदा-निझरकडे जाणाऱ्या रस्त्यावर पांढऱ्या रंगाच्या टाटा मांझा वाहनास हात देऊन थांबविले, मात्र वाहन न थांबता ते तळोदा रोडकडे भरधाव निघून गेले.

त्या वाहनावर संशय बळावल्याने वाहनाचा पाठलाग करून त्यास थांबविले असता, चालक वाहन सोडून पळत असताना त्यास पकडले. त्याचे नाव, गाव विचारले तर त्याने पंकज नामदेव चौधरी (वय ३२, रा. साक्री नाका, नंदुरबार) असे सांगितले. त्याच्या ताब्यातील वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये एकूण ४५ खाकी रंगाचे देशी दारूचे बॉक्स मिळून आले. (latest marathi news)

Superintendent of Police Shravan Dutt S., Additional Superintendent of Police Nilesh Tambe, along with fake liquor manufacturing materials and liquor bottles seized by the local crime branch team.
Crime News: गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणास पोलिसांनी केली अटक

अधिकची विचारपूस करता मुद्देमाल जोगणीपाडा गावातील एका शेतातून आणल्याचे सांगितले. त्याचा साथीदार प्रशांत विक्रम पाडवी असे संगनमताने बनावट दारू बनवून तिची चोरटी विक्री करीत असल्याची कबुली दिली.

पथकाने तत्काळ जोगणीपाडा-बोरदा रस्त्यावरील एका शेतात पत्र्याच्या शेडमध्ये जाऊन तपासणी केली असता प्रशांत विक्रम पाडवी (४०, रा. जयहिंद कॉलनी, नंदुरबार) मिळून आला. तेथे पत्र्याच्या शेडमध्ये व शेतात बनावट दारूच्या बाटल्या व दारू बनविण्यासाठी लागणारे साहित्य असा एक लाख ५७ हजार ४१६ रुपये किमतीचा मुद्देमाल मिळाला.

अवैध बनावट दारूचा साठा कायदेशीर प्रक्रिया करून जप्त केला असून, दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही आरोपींकडून नऊ लाख आठ हजार ६१६ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

Superintendent of Police Shravan Dutt S., Additional Superintendent of Police Nilesh Tambe, along with fake liquor manufacturing materials and liquor bottles seized by the local crime branch team.
Mumbai Crime News: धक्कादायक! मुंबईतील शॉपिंग सेंटरच्या टॉयलेटमध्ये महिलेचा विनयभंग करुन हत्येचा प्रयत्न

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com