Nandurbar Crime News : दारुची वाहतूक करणारी चारचाकी जप्त! 8 लाखाचा मुद्देमाल ताब्यात; एकास अटक

Crime News : राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या पथकाने गुरुवारी (ता.४) ही कारवाई करत याप्रकरणी एकास अटक केली.
A team of State Excise Department with illegal liquor and arrested suspect.
A team of State Excise Department with illegal liquor and arrested suspect. esakal

शहादा : तालुक्यातील शहाणा मालकातर रस्त्यावर अवैधरीत्या दारुची वाहतूक करणारी चारचाकी (पिकअप) पोलिसांनी ताब्यात घेत आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या पथकाने गुरुवारी (ता.४) ही कारवाई करत याप्रकरणी एकास अटक केली. (Nandurbar Crime Four wheeler transporting liquor seized)

राज्य उत्पादन शुल्क, नंदुरबार व निरीक्षक, भरारी पथक, नंदुरबार यांनी दारुची अवैधरीत्या वाहतूक होणार असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फेत मिळाली होती. या बातमीनुसार गुरुवारी पथकाने शहाणा मालकातर रोड, शहाणा शिवार, शहाणा, ता. शहादा, जि. नंदुरबार येथे सापळा रचला.

यावेळी पोलिसांनी एका चारचाकी (एम. एच. १८,बीजी ३०९३) वाहनास अडवून तपासणी केली असता पथकास वाहनामध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित मध्यप्रदेश राज्यात निर्मित व फक्त मध्यप्रदेश राज्यात विक्री ग्राह्य असलेली बिअरचे बॉक्स मिळून आले. पोलिसांनी वाहनासह सात लाख ७६ हजार रुपये किमतीचे मुद्देमाल जप्त केला. (latest marathi news)

A team of State Excise Department with illegal liquor and arrested suspect.
Wardha Crime : मित्राच्या पार्टीत मैत्रीण दिसताच संताप अनावर; मित्रावर केला हल्ला

सदर कारवाई नंदुरबार येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक बी. एस. महाडीक, भरारी पथक निरीक्षक व्ही. ए. चौरे, दुय्यम निरीक्षक अमित गायकवाड, पी. व्ही. मोर, एम. के. पवार, सहायक दुय्यम निरीक्षक अमित गायकवाड, बी. एम. चौधरी, संजय बैसाणे, एम. एन. पाडवी व धनराज पाटील यांच्या पथकाने केली.

A team of State Excise Department with illegal liquor and arrested suspect.
Khaparkheda Crime : पैशावरून वाद विकोपाला गेल्याने मुलाने केला वडिलांचा खून

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com