Nandurbar Crime News : दुचाकीचोरांच्या टोळीस पिंपळनेर पोलिसांकडून बेड्या; 6 दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश

Nandurbar Crime : येथील पोलिसांची धडक कारवाई, शहरांमधील दुचाकी चोरणाऱ्या टोळीतील दोन जणांसह मध्य प्रदेशमधील एका आरोपीला पिंपळनेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
Assistant Police Inspector Sachin Kapadnis and staff with seized bikes.
Assistant Police Inspector Sachin Kapadnis and staff with seized bikes.esakal

Nandurbar Crime News : येथील पोलिसांची धडक कारवाई, शहरांमधील दुचाकी चोरणाऱ्या टोळीतील दोन जणांसह मध्य प्रदेशमधील एका आरोपीला पिंपळनेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून सहा दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कापणीस व पथकाने कारवाई केली. शहरातील पाटील गल्लीतील सतीश गांगुर्डे यांच्या मालकीची दुचाकी (एमएच १८, बीक्यू २६५५) घरासमोरून ३० ते ३१ मेदरम्यान चोरून नेल्याची तक्रार १ जूनला पिंपळनेर पोलिस ठाण्यात दिली होती. ( Gang of two wheeler thieves arrested by Pimpalner police )

दरम्यान, तपास अंमलदार असई अशोक पवार यांना चोरीबाबत खेतिया (मध्य प्रदेश) येथील अल्केश अशोक जाधव या व्यक्तीबाबत माहिती मिळाली होती. माहितीची पुष्टी करण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कापडणीस यांनी सूत्रे हाती घेत वरिष्ठांना माहिती देत दिलेल्या सूचनेनुसार पथक तयार करून शोधादरम्यान संशयित अल्केश अशोक जाधव यास दुचाकीसह शिताफीने ताब्यात घेतले.

Assistant Police Inspector Sachin Kapadnis and staff with seized bikes.
Nandurbar Crime News : बालिकेचा विनयभंग प्रकरणी आरोपीस; 12 वर्षे एक महिना कारावासाची शिक्षा

त्याने साथीदार मोहित चंद्रकांत पाटील (रा. गांधी चौक, पिंपळनेर, ता. साक्री), कल्पेश दीपक चौधरी (रा. हरिओमनगर, पिंपळनेर, ता. साक्री) सोबत दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पिंपळनेर शहर व इतर ठिकाणावरून दुचाकी चोरीची कबुली दिली. पिंपळनेर पोलिसांचा अधिक तपास सुरू असून, आणखी दुचाकी चोरीचे प्रकार उघडकीस येण्याची शक्यता आहे. गुन्ह्यातील तक्रारदार मजुरीकाम करीत असल्याने चोरट्यांनी चोरून नेलेल्या दुचाकी पोलिसांकरवी मिळून आल्याने आनंद व्यक्त करून पोलिसांचे कौतुक केले.

ही कामगिरी पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सचिन कापडणीस, पोसई विजय चौरे, असई ईश्वर शिरसाठ, अशोक पवार, हवालदार प्रकाश मालचे, प्रवीण धनगर, हेमंत पाटोळे, रवींद्र सूर्यवंशी, दिनेश माळी, धीरज गवते, योगेश महाले यांचा सहभाग होता.

Assistant Police Inspector Sachin Kapadnis and staff with seized bikes.
Nandurbar Crime News : जिल्हा पोलिसांच्या कारवाईत 3 कोटींचा मुद्देमाल जप्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com