A police team with a liquor stock worth thirty one lakhs.
A police team with a liquor stock worth thirty one lakhs.esakal

Nandurbar Crime News : नंदुरबारला साडेअठरा लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

Nandurbar Crime : महाराष्ट्रातून नवापूरमार्गे गुजरातमध्ये अवैधरीत्या देशी-विदेशी दारूच्या चोरट्या वाहतुकीवर कारवाई करत १८ लाख ३८ हजार ५६० रुपये किमतीची विदेशी दारू व दोन वाहने जप्त करण्यात आली.

Nandurbar News : पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाल्याने महाराष्ट्रातून नवापूरमार्गे गुजरातमध्ये अवैधरीत्या देशी-विदेशी दारूच्या चोरट्या वाहतुकीवर कारवाई करत १८ लाख ३८ हजार ५६० रुपये किमतीची विदेशी दारू व दोन वाहने जप्त करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे व नवापूर पोलिस ठाण्याचे एक पथक तयार करून कारवाईसाठी तत्काळ रवाना केले. (Nandurbar Crime Illegal liquor stocks worth eighteen and a half lakh seized)

नवापूर तालुक्यातील बेडकी नाका आंतरराज्य सीमा तपासणी नाकाबंदीच्या ठिकाणी मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखा व नवापूर पोलिसांनी सापळा रचला व मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पांढऱ्या रंगाचे चारचाकी वाहन व त्यामध्ये टोमॅटो भरलेले प्लॅस्टिकचे क्रेट व वांग्यांनी भरलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या ठेवलेल्या होत्या.

क्रेट व पिशव्यांच्या खाली विदेशी दारूचे खोके लपवून अवैधरीत्या गुजरातमध्ये चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने विनापरवाना वाहतूक करताना मिळून आले. वाहनावरील चालकास विश्वासात घेऊन अधिकची विचारपूस करता त्याने हा माल त्याच्या साथीदारांसह धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील कळंबीर शिवारातील एका पडीक शेतातून भरून एका पांढऱ्या रंगाच्या बोलेरो वाहनातून अवैधरीत्या विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितले.

त्याअन्वये नवापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी त्यांच्या स्टॉफसह व स्थानिक गुन्हे शाखेचे किरणकुमार खेडकर यांच्या पथकाने आरोपीच्या साथीदारांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्यांच्याकडून १९६ खोकी असा १८ लाख ३८ हजार ५६० रुपये किमतीची विदेशी दारू व यासाठी वापरण्यात आलेली वाहनेदेखील जप्त करण्यात आली आहेत.

A police team with a liquor stock worth thirty one lakhs.
Pune Crime News : कामगाराचा खून करणाऱ्या पर्यवेक्षकाला जन्मठेपेसह 5 हजाराची दंडाची शिक्षा

महेंद्र ऊर्फ राहुल राजेंद्र मराठे (वय २७, रा. उधना, गुजरात), सागर आबा भदाणे (२४, रा. सुरत, गुजरात), हरीश गोविंदा देवीकर (२७, रा. सुरत, गुजरात), मोहनेश ऊर्फ गोकुळ प्रभाकर चित्ते (३२, रा. साक्री, जि. धुळे), युवराज राजेंद्र जाधव (४३, रा. साक्री, जि. धुळे), राकेश तानाजी ठाकरे (२९, रा. साक्री, जि. धुळे, सचिन सुनील न्याहाळदे (२४, रा. जैताणे, ता. साक्री) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

कारवाई पथक

ही कारवाई नंदुरबार पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस., अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनेश भदाणे व स्थानिक गुन्हे शाखा व नवापूर पोलिस ठाण्याच्या पथकाने केली आहे.

A police team with a liquor stock worth thirty one lakhs.
Pune Crime News : ‘हवेत उडणारे’ चोरटे अखेर जमिनीवर ; विमानाने पुण्यात येऊन चोरी करणारी राजस्थानमधील टोळी गजाआड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com