Nandurbar Crime News : बनावट कागदपत्रांद्वारे दारूची अवैध वाहतूक

Nandurbar Crime : गोवा राज्यात निर्मित दारूची बनावट कागदपत्रांद्वारे अवैध वाहतूक करणारी सुमारे दहा लाख रुपये किमतीची मालट्रक व ३३ लाख ६० हजार रुपये रुपये किमतीची विदेशी विस्की
Police officers and staff with the liquor seized by the police.
Police officers and staff with the liquor seized by the police.esakal

शहादा : गोवा राज्यात निर्मित दारूची बनावट कागदपत्रांद्वारे अवैध वाहतूक करणारी सुमारे दहा लाख रुपये किमतीची मालट्रक व ३३ लाख ६० हजार रुपये रुपये किमतीची विदेशी विस्की, असा एकूण ४३ लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल शहादा पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, उर्वरित तीन आरोपी फरारी आहेत. (Nandurbar Crime Illegal transportation of liquor through forged documents)

विशेष म्हणजे, अहमदनगर येथून शहादा येथील एका मेडिकल दुकानाच्या नावे बनावट बिलाद्वारे सदर मद्य शहादा येथे आणले जात होते. शहादा दोंडाईचा रस्त्यावरील पोलिस ठाण्यासमोरील संविधान चौकात टाटा कंपनीची ७१० मालवाहू गाडी (एमएच ०४, एलक्यू ५९६२) ची नाकाबंदीदरम्यान बुधवारी (ता. १०० सकाळी साडेसातच्या सुमारास पोलिसांनी तपासणी केली असता, त्यात संशयास्पद कागदपत्रे आढळून आली.

याबाबत चालकाला व त्याच्या साथीदाराला पोलिसांनी विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर पोलिसांनी मालवाहू ट्रक पोलिस ठाण्यात आणला. तेथे पोलिसांना तपासणीदरम्यान गोवा राज्यात निर्मित विदेशी दारूचा मोठ्या प्रमाणात साठा आढळून आल्याने पोलिसही आश्चर्यचकित झाले.

पोलिसांना सदर ट्रकमध्ये गोवा राज्यात निर्मित रॉयल ब्ल्यू माल्ट व्हिस्कीचे एकूण ५०० बॉक्स आढळून आले. प्रत्येक बॉक्समध्ये १८० एमएलच्या ४८ बॉटल्स, अशा एकूण २३ हजार बॉटल्स जप्त केल्या आहेत, तसेच पाच हजाराचा एक व्हिवो कंपनीचा काळ्या रंगाचा ड्यूएल सीम मोबाईल.

Police officers and staff with the liquor seized by the police.
Baramati Crime News : बारामतीत सोन्याचे दागिन्यांच्या चोरीने नागरिक चिंताग्रस्त

पाच हजाराचा एक रिअल मी कंपनीचा सिल्व्हर रंगाचा ड्यूएल सीम मोबाईल व दहा लाखांचा एक पांढऱ्या रंगाचा बंद बॉडीचा टाटा कंपनीची ७१० मालवाहू ट्रक, असा एकूण ४३ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी शहादा पोलिसांत पोलिस शिपाई सचिन कापडे यांच्या फिर्यादीवरून अज्जू खान रशीद खान (वय २७, रा. खडकपाणी, ता. कसरावद, जि. खरगोन, रा. मध्य प्रदेश), मोहम्मद महेफुज मोहम्मद लियाकत शहा (वय २५, रा. पनाहनगर, बराई, मियाँ कापुरवा, ता. कुंडा प्रतापगड, जि. प्रतापगड, रा. उत्तर प्रदेश) यांच्यासह पाच आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून, दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. उर्वरित तिघे फरारी होण्यात यशस्वी झाले. उपनिरीक्षक छगन चव्हाण पुढील तपास करत आहेत.

संबंधित कारवाई हे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अभिजित आहिरे, पोलिस कर्मचारी दिनकर चव्हाण, दत्ता बागल, योगेश थोरात, घनश्याम सूर्यवंशी, मुकेश राठोड, राकेश मोरे, अनमोल राठोड आदींनी बजावली.

Police officers and staff with the liquor seized by the police.
Navi Mumbai Crime: खांदेश्वर, पनवेल व परिसरातुन बुलेट व इतर मोटारसायकल चोरी करणारी राजस्थानी टोळी गजाआड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com