Nandurbar Crime: बनावट शिक्के, कागदपत्रांच्याआधारे दारूची तस्करी! जळगावच्या एकास अटक; सैन्यात असल्याचे बनावट ओळखपत्रही जप्त

Crime News : रविवारी (ता.२१) मध्यरात्री नंदुरबार शहरातील जगतापवाडी चौफुली ते करण चौफुली दरम्यान पोलिस गस्तीवर असताना एका कार बाबत पथकाला संशय आला अन...
Arrested
Arrestedesakal

Nandurbar Crime : सैन्यात अधिकारी असल्याचा बनावट ओळखपत्र, कपडे परिधान करीत बनावट शिक्के व कागदपत्राद्वारे डिफेन्स ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा नावाने अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करून शासनाची फसवणुक करणाऱ्या जळगाव येथील फारुक शेख शफी नावाचा संशयितास नंदुरबार पोलिसांनी गुजरातकडे जात असताना अटक केली. संशयिताकडून पोलिसांनी एका कारसह दारू व बनावट शिक्के, कागदपत्रे असा १४ लाखाचा ऐवज जप्त केला आहे. त्याच्याविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nandurbar Crime Liquor smuggling based on fake stamps documents)

रविवारी (ता.२१) मध्यरात्री नंदुरबार शहरातील जगतापवाडी चौफुली ते करण चौफुली दरम्यान पोलिस गस्तीवर असताना एका कार बाबत पथकाला संशय आला. त्यांनी कार थांबवून चौकशी केली असता. फारुक शेख शफी नावाचा व्यक्ती कारमध्ये होता. त्याच्याकडे गुजरात सरकारचा वाहन चालविण्याचा परवाना होता.

तसेच त्याच्या अंगात सैन्यातील अधिकारी असल्यासारखा गणवेशही होता. यावेळी पोलिसांनी त्याच्या कारची तपासणी केली असता त्यांच्याकडे अंदाजे एक लाख २० हजार रुपये किमतीचे विदेशी मद्य मिळून आले.  (latest marathi news)

Arrested
Mumbai Crime: गुंतवणुकीच्या नावाने गंडा घालणार्‍या आरोपीस अटक; वाचा नक्की कशी झाली कारवाई

तसेच मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, लिक्योर डिमांड फॉर मिलिटरी कॅम्प ट्रूपर्स असे नाव असलेला त्यावर मिनिस्ट्री ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असा गोल व ऑफिसर कमांडींग ११०८ आर्म बीडीई कॅम्प फॉर को सी-०५६ एपीओ असा नाव असलेला चौकोनी स्टॅम्प असल्याचे कागदपत्र मिळून आले. तसेच आयकर विभागाचे ओळखपत्र, तसेच रोख ३३ हजार ७२० रुपये मोबाईल, आयफोन असा १४ लाख २० हजार २४० रुपये किमतीचा ऐवज आढळून आला.

संशयित शेख याने अवैध दारुची वाहतूक करण्यासाठी त्यांचे खांद्यावर राजमुद्रा असलेला भारतीय सेनेचा गणवेश परिधान करून लोकसेवक अधिकारी असल्याचे सांगून सैन्यदलातील बनावट कागदपत्रे तयार करत विदेशी मद्याची अवैधपणे वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

Arrested
Jalgaon Crime News: आईच्या साक्षीने पित्यासह भावाच्या खुन्यास जन्मठेप! वार्धक्यात एकाकी जीवन नशिबी; न्यायासाठी आई बनली कठोर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com