Activists cheering after the candidate of Shinde group won in the Nagar Panchayat by-election.
Activists cheering after the candidate of Shinde group won in the Nagar Panchayat by-election.esakal

Dhadgaon Nagar Panchayat By-Election : शिंदे गटाचा उमेदवार विजयी! सरकारी नोकरी लागल्याने सदस्याने दिला होता राजीनामा

Nandurbar News : धडगाव तालुक्यात शिवसेना शिंदे गटाचे विधानसभा संपर्कप्रमुख विजय पराडके यांचे राजकीय वर्चस्व मोठे आहे.
Published on

नंदुरबार : धडगाव नगरपंचायतीतील प्रभाग क्रमांक १४ मधील काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका बीना पावरा यांना शासकीय आश्रमशाळेत नोकरी लागल्याने त्यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या जागेवर पुन्हा पोटनिवडणूक घेण्यात आली. त्यात काँग्रेस उमेदवाराचा पराभव करत शिवसेना शिंदे गटाच्या ममता पावरा यांना ३५८ मते मिळाली असून, ९३ मतांनी त्यांचा विजय झाला.

पुन्हा एकदा धडगाव नगरपंचायतीवर शिवसेना शिंदे गटाने आपला भगवा फडकविला असून, अक्कलकुवा विधानसभा संपर्कप्रमुख विजयसिंग पराडके यांचे वर्चस्व पुन्हा कायम असल्याचे पाहायला मिळाले. (Dhadgaon Nagar Panchayat By Election Shinde Group Candidate Wins)

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com