Nandurbar News : या चिमण्यांनो परत फिरा रे..! ग्रामीण भागातील चिवचिवाट लुप्त

Nandurbar News : ‘या चिमण्यांनो परत फिरा रे’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे वायुप्रदूषणाचा मानवी आरोग्यावरही परिणाम होत असल्याचे वास्तव बघायला मिळत आहे.
At the back of Pandit Pawar's house, a flock of sparrows quench their thirst in the water in a china pot due to the rising heat.
At the back of Pandit Pawar's house, a flock of sparrows quench their thirst in the water in a china pot due to the rising heat.esakal

म्हसदी : सध्या विकासाच्या नावाने होत असलेली वृक्षतोड, मोबाईलच्या लहरी, प्रदूषण यामुळे ग्रामीण भागातील चिमण्यांचा चिवचिवाट कमी झाला आहे. तथापि, मोबाईलच्या अती लहरींमुळे बालगोपाळांचे सवंगडी समजल्या जाणाऱ्या चिमण्यांचे आरोग्य धोक्यात येत हा चिमुकला जीव नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. ‘या चिमण्यांनो परत फिरा रे’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे वायुप्रदूषणाचा मानवी आरोग्यावरही परिणाम होत असल्याचे वास्तव बघायला मिळत आहे. (Nandurbar Disappearance of sparrows chirping)

जंगलतोड, मोबाईलचा अतिरेकी वापर, वाढत्या प्रदूषणाचा फटका तसेच मानवाचे पशु-पक्ष्यांकडे होत असलेले दुर्लक्ष या सर्व प्रकारचा परिणाम निसर्गावर तसेच मानवी जीवनावर होऊ लागला आहे. याकडे जागरूक नागरिकांनी वेळीच लक्ष देण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले. पूर्वी अंगणामध्ये चिमण्यांचा चिवचिवाट ऐकायला मिळत होता.

त्या वेळी आई आपल्या लेकराला ‘एक घास चिऊचा, एक घास बाळाचा’ असे म्हणत लेकराला जेऊ घालत होती. शहरातून जवळपास चिमण्या गायब झाल्या आहेत, तर ग्रामीण भागात अजूनही काही ठिकाणी चिमण्या आढळून येत आहेत. आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात सुरक्षित वनक्षेत्र असल्याने चिमण्यांचा चिवचिवाट आढळून येतो. आता ‘चिऊची’ जागा मोबाईलने घेतली आहे. (latest marathi news)

At the back of Pandit Pawar's house, a flock of sparrows quench their thirst in the water in a china pot due to the rising heat.
Sangli Results : 'विशाल पाटील काँग्रेसचेच खासदार, आम्ही महाविकास आघाडी धर्म पाळला'; विश्वजित कदमांचे महत्त्वाचे विधान

नैसर्गिक संपत्तीवरच घाला

वृक्षतोडीमुळे सिमेंटची जंगले तयार झाल्याने चिमण्यांची संख्याही कमी झाली आहे. पूर्वी ग्रामीण भागात अधिक चिमण्या व पाखरे दिसायची. मात्र, आता त्यांची संख्या फार कमी झाली आहे. कावळे, इतर छोटे पक्षी, चिमण्या दुर्मिळ होऊ लागल्या आहेत. चिमण्या दिसणे काही काळानंतर बंद होईल, अशी भीती पक्षीमित्रांना वाटू लागली आहे.

बहुतांश ठिकाणी वनक्षेत्रे धोक्यात सापडली आहेत. वनक्षेत्रात पशु-पक्ष्यांचा मुक्त संचार असतो. किंबहुना अलीकडे त्यांचा अधिवास नष्ट होत असल्याचे चित्र असल्याने ही निसर्गाची शान दुर्मिळ होणार असल्याचे वास्तव आहे. निसर्गाने खूप काही आणि भरपूर दिले आहे.

पण त्याचे जतन आणि संवर्धन होत नसल्याचे लपून राहिले नाही. मानवी आरोग्यावरही यांचा दुष्परिणाम आजच दिसत आहे. विकासाच्या नावावर होत असलेली बेसुमार वृक्षतोड व सर्वत्र वाढत असलेले सिमेंटचे जंगल यामुळे निसर्गाचे चक्रच बदलले आहे. या साऱ्या विघातक घटकांचा परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे.

At the back of Pandit Pawar's house, a flock of sparrows quench their thirst in the water in a china pot due to the rising heat.
Nandurbar News: नंदुरबार पंचायत समितीच्या सभापतिपदी अंजना वसावे! चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली ठरला फॉर्म्युला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com