Navapur Assembly Constituency: मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करा; नवापूर विधानसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत आवाहन

Nandurbar News : या वेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नवापूर विधानसभा मतदारसंघ तथा जिल्हा पुरवठा अधिकारी नंदुरबार गणेश मिसाळ यांनी निवडणुकीसाठी केलेल्या तयारीबाबत निवडणूक निरीक्षक यांना माहिती दिली.
While guiding the meeting at Nawapur Tehsil Office, Dr. Vishwanath, Police Observer Kumar Gautam, Tehsildar Prashant Kulkarni and Zonal Officer.
While guiding the meeting at Nawapur Tehsil Office, Dr. Vishwanath, Police Observer Kumar Gautam, Tehsildar Prashant Kulkarni and Zonal Officer.esakal

Navapur Assembly Constituency : जनरल ऑब्झर्व्हर डॉ. विश्वनाथ, पोलिस ऑब्झर्व्हर कुमार गौतम यांनी नवापूर विधानसभा मतदारसंघाची मंगळवारी (ता. ८) आढावा बैठक घेतली. या वेळी तहसीलदार प्रशांत कुलकर्णी, गटविकास अधिकारी देवीदास देवरे, मुख्याधिकारी स्वप्नील मुदलवाडकर, गटशिक्षणाधिकारी रमेश चौरे, नायब तहसीलदार सुरेखा जगताप, दिलीप कुलकर्णी, भक्तराज सोनवणे उपस्थित होते. (nandurbar voting Appeal in review meeting of Nawapur Vidhan Sabha news)

लोकसभेच्या नंदुरबार मतदारसंघासाठी निवडणूक आयोगाकडून नियुक्त जनरल ऑब्झर्व्हर डॉ. विश्वनाथ आणि पोलिस ऑब्झर्व्हर कुमार गौतम यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाने केलेल्या तयारीची आढावा बैठक तहसील कार्यालयात झाली.

या वेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नवापूर विधानसभा मतदारसंघ तथा जिल्हा पुरवठा अधिकारी नंदुरबार गणेश मिसाळ यांनी निवडणुकीसाठी केलेल्या तयारीबाबत निवडणूक निरीक्षक यांना माहिती दिली. बैठकीला सर्व सेक्टर ऑफिसर, नवापूर पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे, विसरवाडी पोलिस निरीक्षक झोडगे, नंदुरबार उपनगर पोलिस निरीक्षक उपस्थित होते.

बैठकीच्या वेळी डॉ. विश्वनाथ यांनी मतदान केंद्रावर किमान मूलभूत सुविधांचा आढावा घेतला. सर्व सेक्टर ऑफिसर यांनी ईव्हीएम कामकाजाची माहिती घ्यावी, जेणेकरून मतदान पथकास अडचणी आल्यास त्वरित निराकरण करावे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर आलेले प्रसंग कुशलतेने हाताळावेत, ज्या मतदान केंद्रांवर मागील निवडणुकीत कमी मतदान झाले होते त्या ठिकाणी मतदार जनजागृती कार्यक्रम घ्यावेत. (Latest Marathi News)

While guiding the meeting at Nawapur Tehsil Office, Dr. Vishwanath, Police Observer Kumar Gautam, Tehsildar Prashant Kulkarni and Zonal Officer.
Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

या निवडणुकीत नवापूर विधानसभा मतदारसंघाच्या मतदानावेळी जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, अशा सूचना केल्या. सर्व अधिकारी भारत निवडणूक आयोगाच्या प्रतिनियुक्तीवर आहेत त्यामुळे सर्वांनी आयोगाच्या निर्देशानुसार आपले काम मुदतीत आणि बिनचूक पूर्ण करावे.

पोलिस ऑब्झर्व्हर कुमार गौतम यांनी सर्व नाकाबंदी कडक करावी, मतदानाचे दिवशी कायदा व सुव्यवस्था कुशलतेने हाताळावी, मतदानाचे दिवशी पोलिस सेक्टर अधिकारी फिरस्ती करून बंदोबस्ताचा आढावा घ्यावा, अशा सूचना केल्या. बैठकीस तहसीलदार प्रशांत कुलकर्णी, गटविकास अधिकारी देवीदास देवरे, मुख्याधिकारी स्वप्नील मुदलवाडकर, गटशिक्षणाधिकारी रमेश चौरे, नायब तहसीलदार सुरेखा जगताप, भक्तराज सोनवणे, दिलीप कुलकर्णी उपस्थित होते

While guiding the meeting at Nawapur Tehsil Office, Dr. Vishwanath, Police Observer Kumar Gautam, Tehsildar Prashant Kulkarni and Zonal Officer.
Kolhapur Lok Sabha : कोल्हापूर, हातकणंगलेचा टक्का गतवेळेपेक्षा एकने वाढला; तिसऱ्या टप्प्यात कोल्हापूर राज्यात अव्वल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com