Nandurbar Agriculture News : शहादा तालुक्यातील शेतकरी सज्ज! यंदा कपाशी, सोयाबीन, पपई, केळी, मिरचीला प्राधान्य

Nandurbar News : घरातील शिल्लक शेतमाल विकून तसेच काही शेतकऱ्यांनी नेहमीप्रमाणे बँकेकडून कर्ज घेत यंदाच्या खरिपासाठी पुन्हा सज्ज झाला आहे.
Farmers planting chilli plants on soil beds covered with plastic in Shiwar
Farmers planting chilli plants on soil beds covered with plastic in Shiwaresakal

शहादा : तालुक्यातील शेतकरी कष्टाळू आहेच, सततच्या अस्मानी संकटांना तोंड देत आलेल्या परिस्थितीवर मात करत पुढे चालण्याची त्याची जिद्दही वाखाणण्याजोगी आहे. गेल्या हंगामात कमी पर्जन्यमान, पिकांवरील रोग, उत्पादित मालाला अपेक्षित दर नाही असे अनेक नुकसान सोसूनही बळीराजाने यंदा कपाशी, सोयाबीन, पपई, केळी, मिरची, कपाशीला प्राधान्य दिले आहे.

घरातील शिल्लक शेतमाल विकून तसेच काही शेतकऱ्यांनी नेहमीप्रमाणे बँकेकडून कर्ज घेत यंदाच्या खरिपासाठी पुन्हा सज्ज झाला आहे. त्याला साथ हवीय, ती सिंचन व्यवस्थेची आणि शासनाच्या सकारात्मक धोरणाची. (Nandurbar Farmers of Shahada taluka ready for sowing)

तालुक्यातील सहकारी प्रकल्प बंद अवस्थेत असल्याने शेती हाच येथील मुख्य उत्पन्नाचा व रोजगाराचा आधार आहे. प्रयोगशील अन् जिद्दी असलेल्या शेतकऱ्याने स्वतःला शेतीत झोकून दिले आहे. मात्र नैसर्गिक संकटे आणि ऐनवेळी व्यापाऱ्यांकडून होणारी पिळवणूक यामुळे त्याला आर्थिक नुकसानही सोसावे लागले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पपई, केळीची लागवड शहादा तालुक्यात होते.

मात्र, गेल्या वर्षी पपई, केळी लागवड केलेल्या शेतकऱ्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागले. तरीही तो नव्या उमेदीने शेतीत रमला आहे. तालुक्यात जवळपास सर्वच शेतकऱ्यांची मशागतीची कामे पूर्ण झाली असून, उपलब्ध सिंचनव्यवस्थेवर दहा टक्क्यांपर्यंत बागायती कपाशीची लागवडही झाली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना आता पेरणीसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा लागून आहे.

पेरणीचे नियोजन

तालुक्यात ७१ हजार ६९७ सर्वसाधारण क्षेत्र असून, यात खरिपासाठी ७२ हजार हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांच्या पेरणीचा लक्ष्यांक निश्चित करण्यात आला आहे. यात सालाबादप्रमाणे या वर्षीही कपाशीचे क्षेत्र सर्वाधिक असून, ४६ हजार ९७९ हेक्टरचा लक्ष्यांक असताना जवळपास ४७ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड प्रस्तावित आहे.

त्यापाठोपाठ सोयाबीन १० हजार ५०० हेक्टर, मका सहा हजार ५०० हेक्टर, बाजरी ६५० हेक्टर, खरीप ज्वारी एक हजार ५०० हेक्टर, तर इतर पिके पाच हजार ९५० हेक्टरवर अशी खरिपाची पेरणी प्रस्तावित आहे. तालुक्यात एकेकाळी मूग, उडीद आदी पिकांची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली जात होती. मात्र, आता तालुक्यात बागायती क्षेत्र वाढल्याने तृणधान्य व कडधान्याची पेरणी कमी करून बागायती पिके, फळपीक लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. (latest marathi news)

Farmers planting chilli plants on soil beds covered with plastic in Shiwar
Jalgaon Agriculture News : उत्राण परिसरातील फळबागांचे लाखो रुपयांचे नुकसान; पंचनामे करण्याचे आदेश

केळी, पपईचे आगर

तालुक्यात सिंचन क्षेत्रात बऱ्यापैकी वाढ झाली आहे. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीकडे लक्ष केंद्रित केले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पपई व केळीची लागवड शहादा तालुक्यात होते. तालुक्यात गेल्या वर्षी चार हजार ७०८ हेक्टरवर केळी, तर चार हजार ३१७ हेक्टरवर पपईची लागवड शेतकऱ्यांनी केली होती.

या वर्षी पुन्हा क्षेत्र वाढण्याची चिन्हे आहेत. येथील पपई व केळीला परराज्यात मोठ्या प्रमाणावर मागणी असून, अनेक राज्यांतून व्यापारी येथे शेतकऱ्यांचा उत्पादित माल खरेदीसाठी येत असतात. पपई, केळीचे वाढते क्षेत्र लक्षात घेता जळगाव जिल्ह्यापाठोपाठ शहादा तालुका केळीचे आगर बनू पाहत आहे.

खते, बियाण्यांची उपलब्धता

खरीप हंगामाच्या दृष्टीने कृषी विभागातर्फे विविध रासायनिक खते, बियाणे व कीटकनाशकांची उपलब्धता करून देण्यात आली आहे. तालुक्यात १३८ बियाणे, १२८ रासायनिक खते, तर १२६ परवानाधारक कीटकनाशक विक्रेते आहेत. त्यांच्यामार्फत शेतकऱ्यांना वेळोवेळी कृषी निविष्ठा उपलब्ध करून देण्यात येतात.

यात सुमारे ४१ हजार ७०० टन यूरिया, पाच हजार टन एमओपी, सहा हजार २०० टन डीएपी, १९ हजार ७०१ टन एसएसपी, २४ हजार ७०१ टन मिश्रखते खरिपासाठी उपलब्ध होणार आहेत. त्यांपैकी बहुतांश खतांचा साठा उपलब्धही झाला आहे. (latest marathi news)

Farmers planting chilli plants on soil beds covered with plastic in Shiwar
Nashik Agriculture News : मुरबाड-मृदू जमिनीवर फुलवली वांग्याची शेती; पाळे खुर्दच्या शेतकऱ्याचा प्रयोग यशस्वी

"गेल्या वर्षी अत्यल्प प्रमाणात झालेला पाऊस तसेच शेतमालाला अपेक्षित दर नाही त्यामानाने उत्पन्नही कमी आले. त्यातच अस्मानी संकटांची मालिका सुरू होती. या सर्व गोष्टींशी झुंज देऊन पुन्हा नवीन खरीप हंगामासाठी तयार झालो आहोत. यंदा तरी शासनाकडून शेतमालाला अपेक्षित भाव मिळावा, अशी अपेक्षा आहे." -कैलास पटेल, प्रगतिशील शेतकरी, जावदा, शहादा

"खरीप हंगामाचे नियोजन पूर्ण झाले असून, कृषी निविष्ठाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी विशिष्ट वाणाचा आग्रह धरू नये. कृषी निविष्ठा खरेदी करताना पक्की पावती दुकानदाराकडून घ्यावी. परवानाधारक व्यापाऱ्याकडूनच मालाची खरेदी करावी. काही तक्रार अथवा शंका आल्यास तत्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा."

-काशीराम वसावे, तालुका कृषी अधिकारी, शहादा

खरिपाची २०२३ ची पेरणी व २०२४ नियोजनाची आकडेवारी

पीक लक्ष्यांक प्रत्यक्षात अपेक्षित

कपाशी ४६,९७९ ४६,७३१

४७,०००

ख.ज्वारी २,४९० १,८६१ १,५००

मका ७,९०० ६,२८२ ६,५००

सोयाबीन ९,४३१ १०,१०३ १०,५००

बाजरी ८४० ८०४ ६५०

(वरील सर्व आकडेवारी हेक्टरमध्ये)

Farmers planting chilli plants on soil beds covered with plastic in Shiwar
Nandurbar News: जिल्ह्यात 2 लाख 95 हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन! 23 हजार हेक्टरवर पीक पेरणी; शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com