Nandurbar :...अन्यथा नवापूर शहरात पुराचे पाणी शिरणार! पालिका प्रशासन, ठेकेदाराने नदीपात्रातील भराव काढण्याची नागरिकांची मागणी

Nandurbar News : भराव काढून पावसाळ्याचे पाणी वाहण्यास जागा झाली नाही तर पुराचे पाणी शहरात घुसून मोठी समस्या निर्माण होणार आहे. याबाबतीत पालिका प्रशासन व संबंधित रस्ता निर्माण ठेकेदार यांनी लक्ष देणे गरजेचे आहे
Fill dumped in Rangavali river basin
Fill dumped in Rangavali river basinesakal

नवापूर : शहराची जीवनदायिनी असलेल्या रंगावली नदीवर पुलाचे बांधकाम सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाच्या कामात रंगवली नदीवरील हे काम सुरू आहे. पुलाच्या उभारणीसाठी ठेकेदाराने नदीपात्रात मुरमाचा भराव केल्याने नदीपात्र बुजले गेले आहे. आता पावसाळा तोंडावर आला आहे.

भराव काढून पावसाळ्याचे पाणी वाहण्यास जागा झाली नाही तर पुराचे पाणी शहरात घुसून मोठी समस्या निर्माण होणार आहे. याबाबतीत पालिका प्रशासन व संबंधित रस्ता निर्माण ठेकेदार यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. (navapur Citizens demand municipal administration contractor remove filling from riverbed)

काम कासवगतीने

नवापूर हद्दीतील बेडकी ते फागणे या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. काम अनेक वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे. या कामाला कासवगती म्हणणेसुद्धा चुकीचे ठरेल इतक्या संथगतीने रेंगाळतपणे काम होत आहे.

चौपदरीकरणात शहरातून वाहणाऱ्या रंगावली नदीवर भल्यामोठ्या उंच पुलाचे निर्माण होत आहे. या निर्माणकार्यात ठेकेदाराने त्यांच्या सुविधेसाठी रंगावली नदीपात्रात मुरमाचा भराव करून नदीपात्र सपाट केले आहे. पाणी वाहण्यासाठी लहान चिंचोळी आकाराची जागा व पाइप टाकून ठेवले आहेत.

केटीवेअरचा प्रवाह धोकादायक?

सध्या सर्वत्र वारावादळासह बेमोसमी पाऊस पडत आहे. रंगावली नदीच्या उगमस्थानावर जर मुसळधार पाऊस झाला तर पुराचे पाणी नवापूर शहराकडे येणार यात शंकाच नाही. पुराचे पाणी वाहून जाण्यासाठी पुरेसे नदीपात्र मोकळे नाही. खोकसा, नागझरी, प्रतापपूर, बोरझर, बोकळझर, रायपूर, धनराट, चौकी या भागात पावसाचे पाणी आल्यास ते सरळ नवापूर शहराकडे येते.

दर वर्षी मेअखेर मुसळधार पाऊस पडतो. या वर्षी ही पडेल यात शंकाच नाही. पुलाच्या वरच्या बाजूला पालिकेने शहराला पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी रंगावली नदीवर केटीवेअर बंधारा बांधला आहे. बंधाऱ्यात साठवणूक क्षमतेपेक्षा जास्त पाणीसाठा करता येत नाही. पर्यायी केटीवेअरचे दरवाजे खुले करावे लागतात.

पाण्याचा प्रवाह जोरात सुरू झाल्यावर पाण्याला रस्ता मिळेल तिकडे वळण घेणार आणि नुकसान होणार ही बाब हलक्यात घेण्याइतपत सोपी नाही. मात्र याबाबतीत पालिका प्रशासन स्वतः प्रशासक असूनही गंभीर नाही अथवा डोळेझाक करत आहे असे वाटते. (latest marathi news)

Fill dumped in Rangavali river basin
Dhule News: एकोणीसशे बहात्तरपेक्षा वाईट परिस्थिती शे..! शेतकरी, पशुपालकांच्या भावना; पाणी, चाराटंचाईमुळे दुग्धव्यवसाय अडचणीत

संकटाला नागरिकच तोंड देणार

रस्ता चौपदरीकरण करणाऱ्या ठेकेदाराने या बाबतीत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. परिस्थितीची जाणीव असूनही ते दुर्लक्ष करताना दिसत आहेत. एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहेत असेच एकंदरीत चित्र आहे. पालिका प्रशासन व ठेकेदार यांना गावाशी, ग्रामस्थांशी काहीएक देणेघेणे दिसत नाही.

पालिका प्रशासन अधिकारी एक-दोन वर्षे राहतील, बदली होऊन निघून जातील, तर रस्ता निर्माण करणारे ठेकेदार यांचेही कधीतरी काम संपले की तेही दुसऱ्या ठिकाणी जातील. समस्येला व संकटाला तर नागरिकांना तोंड द्यावे लागेल. या सर्वांच्या परिणामाची झळा तर नवापूरकर व नदीकिनाऱ्यावर राहणाऱ्या नागरिकांना भोगावी लागेल.

माणुसकी म्हणून तरी वेळेच्या आत नदीतील भराव काढून नदीपात्रात मोकळे करावे. नदीला व नागरिकांना मोकळा श्वास घेऊ द्यावा एवढीच माफक नवापूरकरांची अपेक्षा आहे. या समस्येबाबत विचारणा करण्यासाठी पालिका मुख्याधिकाऱ्यांना भ्रमणध्वनी केला, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

"नदीपात्रात असलेला भराव मागील वर्षीदेखील पावसाळ्यापूर्वी काढला होता. आताही जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आले आहेत, लवकरच नदीपात्रातील भराव काढून नदीपात्र पूर्ववत करण्यात येईल."- जे. एम. म्हात्रे, ठेकेदार

Fill dumped in Rangavali river basin
Nandurbar Fake Notes Case: धडगाव परिसरात बनावट नोटांचा सुळसुळाट! सर्वसामान्यांची फसवणूक; लोकसभा निवडणुकीनंतर डोकेदुखी वाढली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com