नंदुरबार- शहरातील उपनगर हद्दीतील गोविंदनगरमध्ये रविवारी (ता. २०) झालेल्या घरफोडीचा उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्याचा तपास करीत अवघ्या २४ तासांत गुन्हा उघडकीस आणत संशयितांना अटक केले. त्यांचाकडून तीन लाख ७६ हजारांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.