Summer Health Tips : हवामान बदलाचा मानवी आरोग्यावर परिणाम; उन्हाळ्यात काळजी घेण्याचे आवाहन

Summer Health Tips : बदल होणे हे सर्वकालीन सत्य आहे आणि हवामान बदल हीसुद्धा एक स्वाभविक प्रक्रिया आहे. परंतु चिंतेची गोष्ट ही आहे, की इतर जीवसृष्टीबरोबरच मानवी आरोग्यावर या हवामानबदलाचा परिणाम होत आहे.
Summer Health Tips
Summer Health Tipsesakal

Nandurbar News : बदल होणे हे सर्वकालीन सत्य आहे आणि हवामान बदल हीसुद्धा एक स्वाभविक प्रक्रिया आहे. परंतु चिंतेची गोष्ट ही आहे, की इतर जीवसृष्टीबरोबरच मानवी आरोग्यावर या हवामानबदलाचा परिणाम होत आहे. हवामान बदलाचे भयावह परिणाम आपल्या आरोग्यावर होत असल्याची माहिती आरोग्य विज्ञान गृहविशेषतज्ज्ञ आरती देशमुख यांनी दिली. (Nandurbar Impact of climate change on human health)

त्या सांगितले, की जागतिक आरोग्य संघटना या संस्थेच्या आरोग्य, पर्यावरण सामजिक मानक विभागाने असे सांगितले, की हवामान बदल अशाच वेगाने होत राहिले तर येणाऱ्या ८० वर्षांमध्ये चार डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान वाढण्याची शक्यता आहे. हवामान बदल्यामुळे बाष्पीभवनाच्या प्रक्रियेला असंतुलीतपणा येतो.

यामुळे जमिनीतील आद्रतेवर प्रतिकूल परिणाम होऊन दुष्काळ पडण्याचा आणि जमीन नापीक होण्याचा धोका संभवतो. भारतातील बहुतांश लोकांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे. मानवी आरोग्यावर हवामानाचा विपरीत परिणाम होऊन त्यांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.

वाढत्या तापमानमुळे चक्रीवादळ, पूर, जंगलातील आग, समुद्रातील वादळ अशा अनेक संकटे आहे. दिवसेंदिवस वाढते कुपोषण, महिलांमधील आजार, अतिलढपणा, लहान वयात केस पांढरे होणे, कमी वयात हृदयविकारचे झटके येणे हे सर्व फक्त हवामनमाधील होणाऱ्या परिणामामुळे दिसून येत आहे. (latest marathi news)

Summer Health Tips
Dhule Summer Heat : वाढत्या तापमानाने कुलर-एसीला पसंती! यंदा 10 ते 15 टक्क्यांनी किंमतीत वाढ

काय करावे

- तहान लागली नसली तरी पुरेसे पाणी प्या. ज्यांना हृदयविकार, मूत्रपिंड किंवा यकृत रोगाबाबत अडचण आहे अशा व्यक्तींनी द्रव सेवन वाढविण्यापूर्वी डॉक्टरचा सल्ला घ्यावा.

- शरीरातील पाण्याचे प्रमाण (हायड्रेट) ठेवण्यासाठी ओआरएस , लस्सी, तोरणी (तांदूळचे पाणी), लिंबाचे पाणी, ताक, नारळपाणी यांसारखे घरगुती पेय वापरा. सैल व सूती कपडे घाला.

- बाहेर असल्यास आपले डोके झाकून ठेवा. एक कापडी टोपी किंवा छत्रीचा वापर करा. आपली त्वचा सुरक्षित करण्यासाठी सन्सस्क्रीन आणि डोळ्यांची काळजीसाठी सनग्लासेस वापरा.

- वृद्ध, मुले, आजारी किंवा जास्त वजन असलेल्या व्यक्तीची विशेष काळजी घ्या. कारण ते उष्णतेचा बळी पडण्याची शक्यता असते.

- जास्त कष्टाचे कामाचे नियोजन दिवसातील कमी उष्णतेच्या वेळेस करावे.

Summer Health Tips
Nashik Summer Heat : उन्हाच्या तडाख्याने जिवाची काहिली; चिमुरड्यांनी लुटला टँकरच्या रेन डान्सचा आनंद

काय करू नये

- उन्हात बाहेर जाणे टाळा, विशेषतः दुपारी १२ ते ३ दरम्यान

- दुपारी बाहेर असताना कष्टाचे कामे टाळा

- अनवाणी बाहेर जाऊ नका

- स्वयंपाक क्षेत्रास पुरेसे हवेदार करण्यासाठी दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवा

- अल्कोहोल, चहा, कॉफी आणि सॉफ्ट ड्रिंक्स टाळा, जे शरीराला निर्जलीकरण करते

- उच्च प्रथिने, खारट, मसालेदार आणि तेलकट पदार्थ टाळा अन् शिळे अन्ने खाऊ नका

- पार्क केलेल्या वाहनामध्ये मुले किंवा पाळी प्राणी एकटे सोडू नका

Summer Health Tips
Summer Hydrating Drinks : उन्हाळ्याची लागली चाहुल, ताक, लस्सीचे फायदे घ्या जाणून

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com