Jeweller Kidnapped
sakal
नंदुरबार: नंदुरबार जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. बुडीगव्हाण (ता. शहादा)जवळ सोमवारी (ता. २७) भरदिवसा सराफ व्यावसायिक रितेश पारेख यांचे हल्लेखोरांनी अपहरण केले. लुटारूंनी त्यांच्या वाहनाची तोडफोड करून अंदाजे ५० किलो चांदी, सोने आणि मोठी रक्कम लुटल्याचा प्राथमिक अंदाज आहे.