Nandurbar Lok Sabha Constituency : तापीकाठावरील दोन्ही ‘दादा’ सध्या ‘न्यूट्रल’!

Nandurbar : कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल हे तापी काठावरील दोन्ही 'दादा' सध्या तरी 'न्यूट्रल'असल्याने त्यांचे कार्यकर्तेही संभ्रमात आहेत.
Jaypalsih Rawal, Abhijit Patil
Jaypalsih Rawal, Abhijit Patilesakal

शहादा : गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार केला, उमेदवारही निवडून आणला. परंतु यंदा शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल हे तापी काठावरील दोन्ही 'दादा' सध्या तरी 'न्यूट्रल'असल्याने त्यांचे कार्यकर्तेही संभ्रमात आहेत. (Nandurbar Lok Sabha Constituency)

कार्यकर्त्यांचा आग्रहास्तव आपली भुमिका जाहीर करण्यासाठी दोन्ही युवा नेत्यांनी शहरातील प्रेस मारुती मैदानावर (ता.१९) सायंकाळी पाच वाजता कार्यकर्त्यांच्या मेळावा आयोजित केला आहे. आजच्या मेळाव्यात ते काय भूमिका घेतात, याकडे जनतेमध्ये उत्सुकता लागली आहे.

नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुका विशेषत: आर्थिक राजधानी म्हणून ओळखला जातो. लोकसभेचे बिगुल वाजल्यानंतर राजकीय नेत्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांसह कोणी शिंदे गटात तर कोणी भाजपात दाखल झाले. अर्थात आपल्या राजकीय सोयीनुसार म्हणा किंवा पक्ष कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव विकासाचे व्हिजन या गोंडस नावाखाली प्रवेश केला.

शहादा तालुक्यात सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील भाजपत आहेत. त्यामुळे स्वतः श्री. पाटील व कार्यकर्ते भाजपच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील हे सर्वश्रुत आहे. इतर नेतेही आपापल्याला सोयीनुसार राजकारण करत आहेत. (latest marathi news)

Jaypalsih Rawal, Abhijit Patil
Nandurbar Agriculture Scheme : आता वनहक्कधारकांनाही विविध कृषी योजनांचा लाभ

परंतु २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अभिजीत पाटील व जयपालसिंह रावल हे दोन्ही नेत्यांनी परस्परांचे राजकीय विरोधक असूनही डॉ. हिना गावित यांच्या विजयासाठी मोठी मेहनत घेतली होती हे सर्वश्रुत आहे. नंदुरबार विधानसभा व लगतचा शिरपूर विधानसभा क्षेत्रात भाजपला मताधिक्य मिळावे म्हणून दोन्ही नेते पायाला भिंगरी लावून फिरले, असे कार्यकर्ते सांगतात.

आता भाजपने पुन्हा डॉ. हिना गावित यांना उमेदवारी दिली असून काँग्रेसकडून माजी मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांचे चिरंजीव ॲड. गोवाल पाडवी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे दोन्ही दादा आपल्या कार्यकर्त्यांचे मत कोणाच्या पारड्यात टाकायला लावतात याविषयी तालुक्यात उत्सुकता आहे.

Jaypalsih Rawal, Abhijit Patil
Nandurbar Lok Sabha Constituency : लोकसभेच्या रणधुमाळीत स्थानिक प्रश्नांची केवळ चर्चाच!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com