Nandurbar Lok Sabha Constituency : नटावद गावाने दिले आतापर्यंत 3 खासदार; स्वातंत्र्यानंतरचे पहिले खासदार ठरले जयंत नटावदकर

Nandurbar News : राज्याच्याच नव्हे; तर देशाचा राजकारणात नंदुरबार आघाडीवरच राहिले आहे. स्वातंत्र्यलढ्यापासून तर स्वातंत्र्यानंतरच्या राजकारणात नंदुरबारकरांचा सहभाग महत्वाचा राहिला आहे.
Nandurbar
Nandurbar esakal

Nandurbar News : तत्कालिन धुळे जिल्ह्याचा राजकारणातही स्वातंत्र्यानंतर नंदुरबारकरांचा सक्रीय सहभाग होता. तत्कालिन धुळे जिल्ह्यातील नंदुरबार लोकसभेचे पहिले खासदार नंदुरबार तालुक्यातील नटावद या गावाचेच ठरले. त्यानंतर या छोट्याशा गावाने आतापर्यंत तीन खासदार दिले आहेत. राज्याच्याच नव्हे; तर देशाचा राजकारणात नंदुरबार आघाडीवरच राहिले आहे. स्वातंत्र्यलढ्यापासून तर स्वातंत्र्यानंतरच्या राजकारणात नंदुरबारकरांचा सहभाग महत्वाचा राहिला आहे. (Nandurbar Lok Sabha Constituency)

समाजसेवेचे व्रत घेत दऱ्या -खोऱ्यातील आदिवासी -दलित गोरगरीबांना शिक्षणाचा प्रवाहात आणण्यासाठी समाजसेवक विनोबा भावे यांच्यासोबत सातपुड्याचा दऱ्या खोऱ्यात फिरून शिक्षणाची गंगा निर्माण करणारे जयंत नटावदकर हे नाव साऱ्यांनाच ज्ञात आहे. समाजसेवेसोबत समाजातील प्रश्‍न सोडविण्यासाठी स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाही सुरू झाली.

त्या लोकशाहीत १९५२ ला लोकसभेची निवडणुक झाली. त्या निवडणुकीत राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे जयंत गणपतराव नटावदकर हे निवडून येत खासदार झाले होते. त्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला. त्यावेळी त्यांनी गोरगरिबांसाठी सुरू केलेल्या आश्रमशाळा, शिक्षण संस्था आजही आदिवासी-दलित, गरीब विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत.

त्यानंतर १९६७ व १९७१ या दोन पंचवार्षिक निवडणुकीत नटावद येथीलच रहिवाशी तुकाराम हुरजी गावित हे राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे दहा वर्ष खासदार होते. त्यानंतर थेट २०१४ व २०१९ असे दहा वर्ष मुळ नटावदचे रहिवाशी असलेल्या डॉ. हिना गावित या खासदार आहेत. त्यांना आता पुन्हा भाजपने तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नटावद गावाने आतापर्यंत २५ वर्ष खासदार दिले आहेत. (Latest Marathi News)

Nandurbar
Nandurbar Loksabha Election : नंदुरबार लोकसभा निवडणूक जिंकणारच; काँग्रेसचे माजी मंत्री वसंत पुरके यांचा दावा

असे आहे यांचे नाते

१९५२ ला खासदार झालेले जयंत नटावदकर हे सध्याचे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते व ज्यांचा नंदुरबार जिल्ह्यात भाजपचे अस्तित्व टिकविण्यात मोलाचा वाटा राहिला आहे, अशा डॉ. सुहास नटावदकर यांचे वडील होते. वडिलांचा समाजसेवेचा वारसा ते आजही चालवित आहेत. त्यांनी राजकीय वारसा चालविण्यासाठी भाजपतर्फे २००४ व २००९ आणि अपक्ष म्हणून २०१४ मध्ये नंदुरबार लोकसभेत उमेदवारी केली मात्र त्यांना यश आले नाही.

जाणकारांच्या मते भाजपचे अस्तित्व टिकविण्यासाठी त्यांनी लढत दिली. मात्र जेव्हा भाजपचे ‘अच्छे दिन’ आले तेव्हा त्यांना डावलण्यात आले, अन्यथा त्यांनाही खासदार होण्याची संधी होती. आता मात्र ते अलिप्त आहेत.तसेच १९६७ व १९७१ या दोन पंचवार्षिक खासदार राहिलेले तुकाराम हुरजी गावित हे विद्यमान खासदार डॉ. हिना गावित यांचे नात्याने आजोबा होते.

Nandurbar
Nandurbar Lok Sabha Election : चाळीस वर्षानंतर राजकारणाचे केंद्रबिंदू बदलले; नवापूरची जागा घेतली नंदुरबारने

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com