Nandurbar Lok Sabha Election : महाराष्ट्र-गुजरात सीमेवर वाहनांची कसून तपासणी

Nandurbar : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-गुजरात सीमेवर महाराष्ट्र पोलिसांकडून सागबारा ते गव्हाळीदरम्यान असलेल्या सीमेवर अक्कलकुवा पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे.
Queue of vehicles while the police are inspecting the vehicles.
Queue of vehicles while the police are inspecting the vehicles.esakal

वाण्याविहीर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-गुजरात सीमेवर महाराष्ट्र पोलिसांकडून सागबारा ते गव्हाळीदरम्यान असलेल्या सीमेवर अक्कलकुवा पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, नंदुरबार जिल्ह्यात १३ मेस मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. (Nandurbar Lok Sabha Elections Scrutiny of vehicles at Maharashtra Gujarat border)

त्या पार्श्वभूमीवर अंकलेश्वर बऱ्हाणपूर आंतरराज्य महामार्गावर गव्हाळी ते सागबारादरम्यान महाराष्ट्र-गुजरात सीमेवर अक्कलकुवा पोलिसांकडून दिवस-रात्र वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. यासाठी दोन पोलिस शिपाई व चार होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. त्याच पद्धतीने वरिष्ठ अधिकारी व भरारी पथकांकडून या ठिकाणी भेटी देऊन कामकाजाची पाहणी करण्यात येत आहे.

अक्कलकुवा गुजरात सीमेवरील तालुका असून, या मार्गाने छुप्या पद्धतीने अवैध प्रकारे अमली पदार्थांची गुजरातमध्ये रवानगी केली जाते. त्यामुळे दिवस-रात्र पोलिस कर्मचारी व अधिकारी या तपासणी नाक्यावर वाहनांची तपासणी करीत आहेत. (latest marathi news)

Queue of vehicles while the police are inspecting the vehicles.
Nandurbar News : नंदुरबारची मिरची-आमचूर पावडरला भौगोलिक मानांकन

त्यासोबतच सर्व वाहनांचे चित्रीकरणदेखील करण्यात येत आहे व सीसीटीव्ही कॅमेरेदेखील लावण्यात आले आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांच्या आदेशान्वये अक्कलकुवा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, हवालदार, पोलिस शिपाई, होमगार्ड तपासणी करीत आहेत. दर दोन तासांनी अधिकाऱ्यांचे भरारी पथकही भेटी देऊन पाहणी करीत आहे.

Queue of vehicles while the police are inspecting the vehicles.
Nandurbar News : नंदुरबारमध्ये विकासकामे प्रचाराच्या केंद्रस्थानी; प्रस्थापित विरुद्ध नवखा उमेदवार आमने-सामने

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com