Nandurbar News : नंदुरबारची मिरची-आमचूर पावडरला भौगोलिक मानांकन

Nandurbar News : नंदुरबारची मिरची आणि सातपुड्याची आमचूर पावडर या दोन्ही मसाल्यांच्या पदार्थांना जागतिक पातळीवर भौगोलिक मानांकन जाहीर झाले आहे.
Certificate of declaration of Global Geographical Indication for both Chili Powder and Amchur Powder.
Certificate of declaration of Global Geographical Indication for both Chili Powder and Amchur Powder.esakal

Nandurbar News : नंदुरबारची मिरची आणि सातपुड्याची आमचूर पावडर या दोन्ही मसाल्यांच्या पदार्थांना जागतिक पातळीवर भौगोलिक मानांकन जाहीर झाले आहे. हा नंदुरबारसारख्या आदिवासी जिल्ह्याचा जागतिक पातळीवरील गौरवच आहे. आता अतिदुर्गम म्हणून ओळख असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील मिरची पावडर व आमचूर पावडर जागतिक स्तरावर पोचणार आहे. त्यातून दोन्ही उत्पादनांना नावलौकिक मिळणार आहे. (Geographical classification of Nandurbar Chilli and Amchur powder)

जिल्ह्यात मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. येथील मिरची सातासमुद्रापार प्रसिद्ध आहे. मात्र, मिरचीला जागतिक बाजारपेठ नव्हती. सातपुड्यातही आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. तेथे आमचूर व्यवसाय चांगला चालतो. मात्र, त्याला अद्याप शासनस्तरावर कोणतीही औद्योगिक चालना मिळालेली नव्हती. खासगी व्यापाऱ्यांकडून या दोन्ही मसाला पिकांची मोठा उलाढाल होते. मात्र, त्याला चालना मिळालेली नाही.

त्यातून उत्पादक शेतकऱ्यांनाही समाधानकारक आर्थिक लाभ मिळत नाही. हे सर्व लक्षात घेऊन येथील कृषी विज्ञान केंद्र, डॉ. हेडगेवार सेवा समिती आणि ‘नाबार्ड’ने पावले उचलली आहेत. हेडगेवार सेवा समितीने २० ऑक्टोबर २०२१ ला मिरची पावडरला जीआय टॅग म्हणजेच जागतिक पातळीवरील भौगोलिक मानांकनासाठी.

तर चोंदवाडे बुद्रुक येथील ‘आम्हू आख्खा एक हाय’ या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्र कोळदे (नंदुरबार) यांनी आमचूर पावडरसाठी केंद्र सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयांतर्गत डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री ॲन्ड इंटर्नल ट्रेडकडे रजिस्ट्रेशन अर्ज दाखल केले होते. कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ श्री. दहातोंडे व संशोधक सहाय्यक आरती देशमुख यांनी प्रयत्न केले. तांत्रिक अडचणींवर मात करीत शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. (latest marathi news)

Certificate of declaration of Global Geographical Indication for both Chili Powder and Amchur Powder.
Nandurbar News : 7 वर्षे उलटून शेतीसाठी ‘धनपूर’च्या पाण्याची प्रतीक्षा!

आमचूर व मिरची पावडरचे नमुनेही पाठविण्यात आले होते. या सर्व बाबींची पूर्तता करीत अखेर दोन वर्षांनंतर ‘नंदुरबार मिरची’ आणि ‘नंदुरबारची आमचूर पावडर’ या दोन्ही मसाल्यांना जागतिक पातळीवर भौगोलिक मानांकन (GI Tag) मिळाले आहे. वाणिज्य व उद्योग मंत्रालयांतर्गत डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री ॲन्ड इंटर्नल ट्रेडने यासंबंधीची अधिकृत माहिती प्रसिद्ध केली आहे.

जीआय मानांकन म्हणजे काय?

भौगोलिक मानांकन ही एक प्रमाणीकरण प्रक्रिया आहे, ज्याद्वारे कोणत्याही वस्तूला जागतिक दर्जावर ओळख प्राप्त करण्यासाठी त्याची भौगोलिक विशेषतः दर्शवली जाते. हे मानांकन भारतीय जीआय कायदा १९९९ अंतर्गत देण्यात येते.

Certificate of declaration of Global Geographical Indication for both Chili Powder and Amchur Powder.
Nandurbar Lok Sabha Election : सामान्य कार्यकर्त्यांची डिमांड वाढली!

जीआय टॅग कसा देतात?

एखाद्या विशेष प्रदेशातील पदार्थाचे वैशिष्ट्य ओळखून, त्यावर संशोधन करणे ही याची प्रमुख प्रक्रिया आहे. त्यानंतर त्या पदार्थाचा भूगोल, इतिहास आणि वैज्ञानिक माहितीसह केंद्र सरकारकडे अर्ज केला जातो.

"नंदुरबारची मिरची व आमचूर पावडरला भौगोलिक मानांकन मिळवून देण्यात येथील नाबार्ड, डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषिविज्ञान केंद्राचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. या मानांकनामुळे या दोन्ही मसाल्यांना जगभरात कुठेही विकता येईल. मानांकनामुळे जगभरात मागणी वाढली, तर या पदार्थांना भावही चांगला मिळेल. त्यातून उत्पादन वाढण्यास मदत आणि उत्पादकांना आर्थिक लाभ होईल. नंदुरबारसाठी ही गौरवाची बाब आहे." - विवेक चौधरी, आयात- निर्यात सल्लागार.

Certificate of declaration of Global Geographical Indication for both Chili Powder and Amchur Powder.
Nandurbar Unseasonal Rain Damage : शहादा तालुक्यातील नुकसानग्रस्तांच्या बांधावर पोहचल्या डॉ. हिना गावित

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com