Nandurbar Lok Sabha Election : लोकसभेसाठी 70 टक्क्यांपेक्षा जास्त मतदानासाठी नियोजन : मनीषा खत्री

Nandurbar Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून, त्यादृष्टीने प्रशासनानेही नियोजन केले आहे.
District Collector Manisha Khatri while giving information in a press conference regarding the Lok Sabha elections
District Collector Manisha Khatri while giving information in a press conference regarding the Lok Sabha electionsesakal

Nandurbar Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून, त्यादृष्टीने प्रशासनानेही नियोजन केले आहे. मतदार नोंदणी, मतदान केंद्र, मतदान यंत्र, मतदान अधिकारी, सहाय्यक आदी नियुक्तीबाबतचे नियोजन व प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण करून प्रशासन आपली जबाबदारी पूर्णपणे पार पाडण्यासाठी सज्ज झाले आहे. ७० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान व्हावे यासाठी नियोजन पूर्ण केले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Nandurbar Manisha Khatri statement Planning for more than 70 percent voter turnout for Lok Sabha Election)

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसंदर्भातील माहिती देण्यासाठी सोमवारी (ता. १८) जिल्हाधिकारी खत्री यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले. या वेळी निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, निवासी उपजिल्हाधिकारी हरीश भामरे, माहिती अधिकारी रणजित राजपूत आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी खत्री म्हणाल्या, की जिल्ह्यात जास्त मतदान कुठे होते, कमी मतदान कुठे होते याबाबत आम्ही मतदान केंद्र अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जाणून घेत त्यानुसार स्वीप पद्धतीने प्रशिक्षणातून अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. ज्याच्यामुळे जिल्ह्यातील कमी मतदान असलेल्या केंद्रावर मतदान वाढविण्यासाठी मदत होईल.

शासनाच्या निर्देशानुसार नंदुरबार लोकसभा मतदारसंघात ७० टक्के मतदान होण्यासाठीचे लक्ष्यांक आहे. त्यापेक्षा जास्त करण्यासाठीचे नियोजन केले आहे. तसेच जिल्ह्यात मतदारयादी तयार झाली आहे. नवमतदारांची नोंदणी झाली आहे. त्यासाठी महाविद्यालयांमध्ये जागृती करण्यात आली होती.

आता मतदान जास्त व्हावे, यासाठी काठी संस्थानच्या होळीच्या निमित्ताने प्रशासनाने तेथे कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे नियोजन आहे. जिल्ह्यातील स्थालांतर होते म्हणून मतदानावर परिणाम होतो. मात्र सध्या होळीचा हंगाम आहे. होळीनिमित्त स्थालांतरित कुटुंबे गावाकडे आलेली असतात. त्या काळात निवडणूक असल्याने स्थलांतराचा निवडणुकीचा मतदानावर परिणाम होणार नाही. (latest marathi news)

District Collector Manisha Khatri while giving information in a press conference regarding the Lok Sabha elections
Jalgaon Lok Sabha Election : रावेरला शरद पवार गटाकडून संतोष चौधरींच्या नावाला पसंती!

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, की नंदुरबार लोकसभा मतदारसंघात नंदुरबार जिल्ह्यासह साक्री व शिरपूरचा समावेश आहे. त्यामुळे पूर्ण मतदारसंघात १९ लाख ५८ हजार ३५३ मतदार आहेत. त्यात नऊ लाख ८७ हजार २९७ पुरुष, तर नऊ लाख ७१ हजार ४५ महिला मतदारांचा समावेश आहे. नंदुरबार जिल्ह्याचा विचार केल्यास १२ लाख ७४ हजार ९७५ मतदार आहेत.

२,११५ मतदान केंद्रे

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात एकूण दोन हजार ११५ मतदान केंद्रे आहेत. त्यात एक हजार ४१२ नंदुरबार जिल्ह्यात व उर्वरित शिरपूर आणि साक्री तालुक्यातील मतदान केंद्रांचा समावेश आहे. साक्री व शिरपूर तालुक्यासाठी धुळे जिल्हाधिकाऱ्यांकडून मतदान यंत्र व अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाईल, मतदान पत्रिका नंदुरबारहून पुरविली जाईल, तर नंदुरबार जिल्ह्यासाठी नंदुरबार जिल्‍ह्यातीलच यंत्रणा नियुक्त केली आहे.

८५ प्लससाठी घरपोच मतदान प्रक्रिया

शासनाने आता ८५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिला-पुरुष मतदार व ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या मतदारांना घरपोच मतदानाचा अधिकार दिला आहे. त्यासाठी जिल्ह्यात सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे. त्यात २९ हजार ३७३ मतदार आहेत. त्यात चार हजार १२२ मतदार दिव्यांग आहेत. त्यांच्यासाठी फार्म ११ डी भरून त्यांच्या मागणीनुसार त्यांना निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे घरपोच बॅलेट पेपरद्वारे मतदान करण्याचा अधिकार दिला आहे. त्यासाठीही यंत्रणा सज्ज आहे.

District Collector Manisha Khatri while giving information in a press conference regarding the Lok Sabha elections
Nandurbar Crime : शहादा परिसरात भूलथापा देऊन लुबाडणारी टोळी सक्रिय! प्रसंगावधानाने कळंबू येथील तरुणाचे वाचले प्राण

युवक व महिला मतदान केंद्र

काही ठिकाणी युवक व काही ठिकाणी महिला मतदान केंद्रे राहणार आहेत. त्यांची सर्व हाताळणी व प्रक्रिया युवक व महिला अधिकारी-कर्मचारी करतील. अशी १२ मतदान केंद्रे असणार असल्याचे जिल्हाधिकारी खत्री यांनी सांगितले.

नंदुरबार लोकसभेसाठी असा आहे कार्यक्रम

* १८ एप्रिल २०२४ ः नोटिफिकेशन

* २५ एप्रिल ः उमेदवारी अर्ज भरणे मुदत

* २६ एप्रिल ः उमेदवारी अर्ज छाननी

* २९ एप्रिल ः उमेदवारी अर्ज मागे घेणे

* १३ मे ः मतदान

* ४ जून ः मतमोजणी व निकाल

* ६ जून २०२४ ः निवडणूक प्रक्रिया पूर्ण

District Collector Manisha Khatri while giving information in a press conference regarding the Lok Sabha elections
Nandurbar News : झुंजीदरम्यान बैल थेट कारमध्ये..! टुकीतील घटनेत पाच जणांनी अनुभवला थरार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com