esakal | नवापूरला पाण्यासाठी महिलांचा हंडा मोर्चा; अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या
sakal

बोलून बातमी शोधा

navapur palika

नवापूरला पाण्यासाठी महिलांचा हंडा मोर्चा; दालनात ठिय्या

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवापूर (नंदुरबार) : शहरातील लाखणी पार्क परिसरात पूर्णक्षमतेने व सुरळीत पाणीपुरवठा झालाच पाहिजे, त्याशिवाय आज पालिकेच्या दालनातून हलणार नाहीत, असा पवित्रा घेऊन महिलांनी मंगळवारी (ता. २५) पालिकेवर हंडा मोर्चा काढला. पालिका प्रशासनाने लेखी आश्वासन देत महिलांना शांत करण्याचा प्रयत्न केला. (women's-pot-strike- for-water-in-navapur-palika)

शहरातील लाखाणी पार्क परिसरात पाणीपुरवठा फक्त दोनच दिवस व्यवस्थित झाला. त्यानंतर परत पाणीपुरवठ्याबाबत अनियमित आहे. पाणीपुरवठा पूर्ण परिसरात, काही घरापर्यंत होत नाही. नियमित व सर्व घरांपर्यंत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी लाखाणी पार्कमधील महिलांनी हंडा मोर्चा काढत पालिका प्रशासकीय अधिकारी अनिल सोनार यांना निवेदन दिले. लाखाणी पार्क येथे कायमस्वरूपी पाणीटंचाई जाणवत आहे. रहिवाशांना परिसरातील विहीरमार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. दर वर्षी उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होते. पार्क निवासी दर वर्षी पालिकेला पाण्यासाठी निवेदन वजा तक्रार करतात. तात्पुरती उपाययोजना म्हणून टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो.

हेही वाचा: बिबट्याच्या पंजाचे ठसे..भीतीने खामखेडा शिवार ओस

सर्व घरांपर्यंत पुरवठा

निवेदन दिल्यानंतर फक्त दोन दिवस नळाद्वारे पाणीपुरवठा नियमित झाला. त्यानंतर पाणीपुरवठा अनियमित झाला. पाणीपुरवठा २० ते २५ घरांपर्यंत होत नाही. नियमित व सर्व घरांपर्यंत पाणीपुरवठा व्हावा. लाखाणी पार्क येथील पाणी टाकी दुरुस्ती करून पाणी टाकी सुरू करावी. या वेळी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष भरत गावित, भाजपचे अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख, लाखाणी पार्कचे परवेज लाखाणी, साजदा शाह, शाहीन शेख, सना पठाण, शीतल महाले, छाया सोनी, फरीद शाहा, वसंत पराडके, जहीर इनामदार, नदीम इमामदार, अशपाक बेलदार, अफिद सय्यद यासह असंख्य रहिवासी उपस्थित होते.

आठ दिवसांत सोडविणार समस्या

पाण्याबाबत ५ मेस लाखाणी पार्कच्या रहिवाशांनी मोर्चा काढला होता. त्या वेळी १५ दिवसांत पाणीपुरवठा सुरू होईल, असे आश्वासन पालिकेने दिले होते. ते आश्वासन पूर्ण न केल्यामुळे अखेर मंगळवारी (ता. २५) लाखाणी पार्कच्या रहिवाशांनी हंडा मोर्चा काढला. प्रशासकीय अधिकारी अनिल सोनार यांनी भाजपचे तालुकाध्यक्ष भरत गावित व लाखाणी पार्कच्या रहिवासी यांना लेखी आश्वासन दिले. लाखाणी पार्क परिसरातील पाणी समस्या ही येत्या आठ दिवसांत निश्चितपणे सोडविली जाईल. परिसरात पाणी देण्याचे वेळापत्रकही देण्यात येईल. परिसरातील आरोग्य व इतर सुविधा नजीकच्या काळात सोडविल्या जातील. नगर परिषदेस सहकार्य करावे, असे लेखी आश्वासनामध्ये म्हटले आहे.