जिवाशी खेळ सुरूच..खासगी बसमधून प्रवाशी वाहतूक सुरूच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिवाशी खेळ सुरूच..खासगी बसमधून प्रवाशी वाहतूक सुरूच

जिवाशी खेळ सुरूच..खासगी बसमधून प्रवाशी वाहतूक सुरूच

नंदुरबार : कोरोनाच्या (corona) पार्श्‍वभूमीवर सर्व प्रकारच्या खाजगी प्रवासी वाहतुकीवर बंदी असताना देखील गुजरात राज्यातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर खाजगी बसमधून प्रवासी वाहतूक करणाऱ्या सहा बसेसवर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या (RTO) विशेष पथकाने कारवाई केली आहे. मात्र, आरटीओ कार्यालयाच्या नंदुरबार (Nandurbar of RTO office) येथील मुख्यालयापासून अवघ्या एक ते दीड किलो मीटर अंतरावर असलेल्या धुळे चौफुलीवरुनदेखील दररोज खासगी बसेसद्वारे (Private bus) प्रवासी वाहतूक सुरू आहे. याकडे दुर्लक्ष केले जात आहे. शिवाय ज्या ठिकाणी या वाहनांमध्ये प्रवासी भरले जातात त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलिस (Police) बंदोबस्त तैनात असतानाही कारवाईबाबत दुर्लक्ष केले जात आहे. (Nandurbar Private bus Passenger transport dangerous rto police not action)

हेही वाचा: धरण, तलावांमध्ये पोहणाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल

नंदुरबार जिल्ह्यात मार्च व एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी राज्यात लॉकडाउन होण्याच्या आधीच सुरुवातीला पंधरा दिवस लॉकडाउन केले. यात सर्व खाजगी प्रवासी वाहतूक बंद करण्यात आल्या होत्या. नंदुरबार जिल्हा हा गुजरात व मध्यप्रदेशच्या सीमेवर असल्याने दोन्ही राज्यांच्या सीमाही सील केल्या होत्या. या काळात प्रवासी वाहतूक करणे आवश्यकच असेल, तर संबंधित प्रवाशांची ४८ तासांपुर्वीची आरटीपीसीआर चाचणी करून कोरोना अहवाल निगेटिव्ह असेल तरच प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली होती. परंतु नवापूर येथील सीमा तपासणी नाक्याजवळून दररोज गुजरात राज्यातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर खाजगी बसेसमधून प्रवासी वाहतूक सुरू होत्या. प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी नाही.

हेही वाचा: पोटच्या मुलांनीच सोडली साथ; कोरोनातून बरी झाल्‍यानंतर घरी नेण्यास नकार

कारवाई का नाही

नवापूर येथे जावून आरटीओ विभागाने सहा वाहनांवर कारवाई केली. मग, याच कार्यालयापासून फक्त एक ते दीड किलोमीटर अंतरावर धुळे चौफुलीवर अशाचप्रकारे लक्झरी बसेस प्रवाशांची वाहतूक करत असतील तर त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही. याबाबत शहरात चर्चा होत आहे.

नियमांचे उल्लंघन...
सोशल डिस्टन्सिंगचे पालन नाही. रात्रीतून शेकडो वाहने नियमबाह्य मार्गस्थ होत होते. याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रकाशित करताच आरटीओच्या विशेष पथकाने सहा बसेसवर कारवाई केली. मात्र, नंदुरबार शहरात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मुख्यालयापासून काही अंतरावरच बिनधास्तपणे खाजगी बसेसमधून दररोज सकाळ संध्याकाळ नियमबाह्य प्रवासी वाहतूक करीत आहे. शहरातील धुळे चौफुलीवर दररोज सकाळी ६ व सायंकाळी ६ च्या सुमारास लक्‍झरी बसेस उभ्या राहतात. येथे पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहनांना अडवून त्यांची चौकशी करतात, त्यांना दंड आकारतात. मात्र, खासगी बसेसमध्ये नियम धाब्यावर ठेवून प्रवासी बसवले जातात. त्यावर मात्र कुठलीही कारवाई केली जात नाही.

loading image
go to top