Mud House Health Benefit: कौलारू घरांच्या दुरुस्तीची लगबग! मातीच्या घरांचे आकर्षण वाढले; शेणाने घराला सारवणे आरोग्यासाठी महत्त्वाचे

Nandurbar News : अलीकडे सिमेंटच्या घरांचे प्रमाण वाढले असले तरी नंदुरबार जिल्ह्यातील विशेषतः सातपुड्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात आजही मातीचे घरे मोठ्या प्रमाणावर दिसून येतात
Women cleaning and repairing the house before the monsoon in the area of ​​Lakkadkot.
Women cleaning and repairing the house before the monsoon in the area of ​​Lakkadkot. esakal
Updated on

तळोदा : अलीकडच्या काळात सिमेंटच्या घरांचे प्रमाण वाढले असले तरी सातपुड्याच्या ग्रामीण, तसेच दुर्गम भागात मातीपासून तयार करण्यात आलेल्या कौलारू घरांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. पावसाळा जवळ आल्याने गेल्या काही दिवसांपासून कौलारू घरांची डागडुजी करण्याचे काम अनेकांनी हाती घेतले आहे. त्यामुळे या भागात सर्वत्र कौलारू घरांची दुरुस्तीची लगबग सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. (nandurbar attraction of mud dung houses health benefits)

अलीकडे सिमेंटच्या घरांचे प्रमाण वाढले असले तरी नंदुरबार जिल्ह्यातील विशेषतः सातपुड्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात आजही मातीचे घरे मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात तर सर्वत्र मातीपासून तयार केलेली झोपडी किंवा कौलारू घरे नजरेस पडतात. पुढच्या महिन्यात पावसाळा सुरू होणार आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी घरांची दुरुस्ती करणे गरजेचे असल्याने, सध्या ग्रामीण भागात घरांची दुरुस्ती करताना सर्वजण दिसून येत आहेत.

कौलारू घरे दुरुस्त करण्याचा अनुभव खूप कमी लोकांना असल्याने, संबंधित लोकांची मनधरणी करताना घरमालकाच्या नाकीनऊ येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे घरमालक स्वतः कुटुंबाचा मदतीने घराची दुरुस्ती करीत असल्याचे दिसून येत आहे.

सातपुड्याच्या परिसरात व पायथ्याशी असलेल्या विविध भागांमधील आदिवासी समुदायांची पारंपरिक घरे ही माती, शेण व कौलारू असतात. त्यांची रचना काँक्रिटच्या घरांपेक्षा चांगली असते. या मातीच्या घरात आरामदायक जीवन असते. शेणाने घराला सारवणे हे आरोग्यासाठी महत्त्वाचे असते आणि यामुळे अनेक रोगांपासून बचाव होतो असे आदिवासी जाणकार म्हणतात. त्यामुळे घरांचे आकर्षण वाढले आहे. (latest marathi news)

Women cleaning and repairing the house before the monsoon in the area of ​​Lakkadkot.
Clay Pot Benefits: जेवणाची लज्जत वाढविण्यासाठी मातीच्या भांड्यांचा वापर: आरोग्याचीही होत नाही ‘माती'

...असे तयार होते घर

सातपुड्याच्या ग्रामीण व दुर्गम भागातील घरे ही माती व लाकडापासून तयार होतात. घरांच्या वरती बांबूची चपटे असतात आणि त्यावर मातीचे कौलं. भिंत तयार करण्यासाठी बांबूच्या चापट्यापासून बनविलेले तट्टे वापरण्यात येतात. यासाठी कापसाच्या काड्यांचा वापरदेखील करण्यात येत आहे. त्यावर माती, शेणाने सारवले जाते आणि मग घर तयार होते.

"आदिवासी लोक ज्या भागात राहतात त्याठिकाणी पूर्वी खूपच मोठ्या प्रमाणात मातीचा घरं होती. पण आता ही मातीचे घरे कमी होत आहेत. त्यामुळे आदिवासी पारंपरिक भाव-भावना, मूल्ये, रीति-रिवाज, आचार, विचार आणि आरोग्यावर देखील याचा परिणाम होत असल्याचे चित्र आहे." - संतोष पावरा, रहिवासी लक्कडकोट

Women cleaning and repairing the house before the monsoon in the area of ​​Lakkadkot.
Surya Namaskar Benefits : तुम्ही दररोज न चुकता सुर्यनमस्कार घातले तर काय होईल?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com