Surya Namaskar Benefits : तुम्ही दररोज न चुकता सुर्यनमस्कार घातले तर काय होईल?

शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी योगासने अनेक वर्षांपासून ओळखली जातात
Surya Namaskar Benefits
Surya Namaskar Benefits esakal

Surya Namaskar Benefits :

सकाळी उठून अंघोळ नाश्ता करून तुम्ही ऑफीस, घरकाम, कॉलेजला जात असाल. आणि रात्री येऊन जेऊन मोबाईल घेऊन झोपत असाल. तर याला सुखी आयुष्य म्हणता येईल. पण जर तुम्हाला निरोगी आयुष्य जगायचे असेल तर काही बदल करणे गरजेचे आहे.

काम आणि धावपळ करून मन थकतं. तेव्हा शरीरासोबत मनालाही आराम हवा असतो. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा कामावर उभं जाण्यासाठी उर्जेची गरज असते. ती उर्जा आपल्याला सूर्यनमस्कारातून मिळते. दररोज सुर्यनमस्कार करण्याचे अनेक फायदे आहेत. ते कोणते याबद्दल जाणून घेऊयात.     

Surya Namaskar Benefits
Yoga Tips: तुम्हाला दिवसभर थकवा जाणवत असेल तर करा 'हे' दोन योगा, राहाल तंदूरूस्त आणि उत्साही

शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी योगासने अनेक वर्षांपासून ओळखली जातात. त्याच्या फायद्यांमुळे ते जगभरात लोकप्रिय होत आहे. सूर्यनमस्कार हा एक असा योग आहे. जो तुम्हाला निरोगी राहण्यासाठी खूप मदत करू शकतो.

फिट राहण्यासाठी तुम्हाला दररोज फक्त 10 मिनिटे काढावी लागतील. सकाळी सूर्योदयाच्या वेळी आणि नेहमी रिकाम्या पोटी सुर्यनमस्कार करण्याचा प्रयत्न करा.

Surya Namaskar Benefits
World Diabetes Day 2023 : डायबिटीजला नियंत्रित ठेवण्यासाठी रोज करा ‘ही’ योगासने
Surya Namaskar Benefits
Yoga Tips: थायरॉईडच्या औषधापासून मुक्ती हवी असेल तर 'या' योगासनांचा नियमित करा सराव, मिळेल आराम

सुर्य नमस्कार म्हणजे काय?

सकाळी सूर्योदयानंतर एका विशिष्ट क्रमाने १० किंवा १२ पवित्रे करणे याला सूर्यनमस्कार म्हणतात. सूर्यनमस्कारामुळे आपले आरोग्य चांगले राहते आणि आपल्या स्मरणशक्तीचाही विलक्षण विकास होतो.

वजन कमी करण्यास मदत करतो

चुकीची लाइफस्टाइल, बैठी काम आणि फास्टफूड्सचा अतिरेक यामुळे आजकाल लोकांचे वजन वाढण्याचे प्रमाण वाढले आहे. वजन कमी करण्यासाठी इतर व्यायामाबरोबर तुम्ही सुर्यनमस्कारही घालण्यास सुरूवात केली तर ते फायद्याचे ठरेल.  

स्नायू आणि सांधे मजबूत करतो

तुम्ही काही दिवस न चुकता सुर्य नमस्कार घातले तर त्याचा तुमच्या सांधेदुखीला फायदा होईल. सूर्यनमस्कारामुळे मस्तक, मान, हात, पाय, छाती, पोट, कंबरेचे स्नायू, मेरुदंड, पायाची बोटे, गुढगे, सर्व सांधे यांना व्यायाम घडतो. सुर्य नमस्कार केल्याने स्नायू आणि सांधे दुखी बरी होते.

Surya Namaskar Benefits
International Diabetes Conference : मधुमेहाच्या संशोधनासाठी सांघिक प्रयत्नांची गरज

सुर्य नमस्कार हा अनेक व्यायामांचा पूर्ण संच आहे. ज्यामुळे जसे शरीराचे दुखणे दूर होते. तसे शारीरिक क्रियेवरही त्याचा परिणाम होता. सुर्य नमस्कार घातल्याने पचनसंस्थेचे कार्य सुरळीत होण्यास मदत होते.

Surya Namaskar Benefits
Diabetes Patient Diet : या गोष्टींचे सेवन म्हणजे मधुमेही रूग्णांसाठी धोक्याची घंटा, आजार अधिकच बळावेल

निद्रानाशापासून होते मुक्ती

आजकाल मोबाईलमुळे लोकांची झोप उडाली आहे. दिवसभर कामामुळे आराम मिळत नाही अन् रात्री मोबाईल उशाजवळ असतो, त्यामुळे झोप येत नाही. अशाने लोकांना निद्रानाशाचा त्रास होऊ शकतो. तुम्ही रोज सुर्य नमस्कार घातले तर तुम्हाला या रोगातही फरक पडू शकतो.

मानसिक तणाव पातळी कमी करते

सुर्य नमस्कार हा असा व्यायाम आहे, ज्यात शारीरिक व्याधी तर दूर होतातच. पण, त्याचबरोबर मानसिक तणावापासूनही मुक्तता होते.  

मधुमेहावरही होतो परिणाम

झपाट्याने वाढणाऱ्या मधुमेहावरही सुर्य नमस्कार गुणकारी आहे. कारण, सुर्य नमस्कारांमुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते. त्यामुळे मधुमेहातूनही आपली सुटका होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com