Nandurbar News : अवजड वाहनांमुळे गटार तुटली; रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात

Nandurbar News : डामरखेडा (ता. शहादा) पुलाचे दुरुस्ती काम सुरू असल्याने शहादा-नंदुरबार मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये वळविण्यात आली आहे.
A pothole caused by a heavy vehicle breaking the concrete on the gutter.
A pothole caused by a heavy vehicle breaking the concrete on the gutter.esakal

पुरुषोत्तमनगर : डामरखेडा (ता. शहादा) पुलाचे दुरुस्ती काम सुरू असल्याने शहादा-नंदुरबार मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये वळविण्यात आली आहे. ही वाहने लोणखेडा चार रस्ता मार्गाने जात आहेत. खेतिया-विसरवाडी महामार्ग बाजूला गावातील सांडपाण्याची गटर तयार करण्यात आली आहे. (Nandurbar Sewer broke due to heavy vehicles)

अवजड वाहने तेथून वळण कापत असताना गटारीवरील काँक्रिट तुटून मोठा खड्डा पडला आहे. खड्डा पडण्यास चार ते पाच दिवस उलटूनही अजूनपर्यंत संबंधित विभागाने त्याची दखल घेतलेली नाही. येथेच व्यापारी दुकाने असून, रात्री-अपरात्री मोटारसायकल, चारचाकी वाहने या खड्ड्यात जाऊन अपघात घडत आहेत.

विसरवाडी-खेतिया महामार्ग तयार होऊन वर्ष उलटले असूनही लोणखेडा चार रस्ता येथील हायमास्ट संबंधित ठेकेदाराकडून सुरू करण्यात आलेले नाहीत. डिव्हायडरवरील पथदीपसुद्धा बंद स्थितीत असून, रात्री-अपरात्री अपघातांचे प्रमाण वाढत आहे. लोणखेडा चार रस्ता येथे वाहतूक कोंडीचा सामनाही प्रवाशांना करावा लागत आहे.

रस्त्यावर कोणतेही दिशादर्शक फलक नसल्याने वाहनचालकांना रस्ता विचारण्याकरिता वाहने थांबवावी लागत असून, समस्येचा सामना करावा लागत आहे. लोणखेडा चार रस्ता येथे परिवहन विभागाकडून वाहतूक नियंत्रण कर्मचारी नेमण्यात यावा, असेही नागरिकांमधून बोलले जात आहे. चार रस्ता येथे व्यापारी दुकाने असून, त्यांनाही या समस्यांचा सामना करावा लागत आहे. (latest marathi news)

A pothole caused by a heavy vehicle breaking the concrete on the gutter.
Nandurbar Lok Sabha Constituency : नंदुरबारमध्ये चर्चा विकास अन कोऱ्या पाटीची!

तसेच खेतिया-विसरवाडी महामार्ग तयार झाल्याने या रस्त्यावरून वाहने अतिवेगाने जातात. लोणखेडाहून मलोणीमार्गे शहाद्याकडे जाणारा रस्ता अरुंद असल्याने मोठी अवजड वाहने यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यातच अवैद्य वाळू वाहतूक व गौणखनिज वाहतुकीची वाहनेसुद्धा याच मार्गाने जात असून.

त्यांच्यावर कोणाचाच वचक राहिला नसल्याचे दिसून येत आहे. चार रस्ता येथे रिक्षा व बसथांबा असल्याने समस्या अधिकच वाढत असून, नागरिकांमध्ये याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

"चार रस्ता लोणखेडा रहदारीचे व गजबजलेले ठिकाण असून, येथे वाहतूक कोंडी, रस्त्यावर पडलेले खड्डे व रात्रीच्या वेळेस पथदीप बंद असल्याने नागरिकांना समस्यांच्या सामना करावा लागत आहे. संबंधित विभागाने दखल घेऊन लवकरात लवकर समस्या सोडवाव्यात."- समर करंके, ग्रामस्थ, लोणखेडा

A pothole caused by a heavy vehicle breaking the concrete on the gutter.
Nandurbar Lok Sabha Constituency : भाजपच्या डॉ. हीना गावित आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com