Nandurbar News : डासांमुळे शहादावासीयांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; अनेक लहान-मोठे क्लिनिक हाउसफुल

Nandurbar News : शहर व परिसरातील विविध भागांत मोकळ्या भूखंडांवर सांडपाणी, स्वच्छतेचा अभाव, उघड्या गटारी यामुळे शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
of dirt in open pits in the Govind Nagar area of ​​the city
of dirt in open pits in the Govind Nagar area of ​​the cityesakal

शहादा : शहर व परिसरातील विविध भागांत मोकळ्या भूखंडांवर सांडपाणी, स्वच्छतेचा अभाव, उघड्या गटारी यामुळे शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, शहरवासीयांच्या आरोग्याच्या प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक लहान-मोठे क्लिनिक हाउसफुल झाले आहेत. पालिकेच्या आरोग्य विभागाने फवारणी करावी, अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे. (Nandurbar shahada Due to sewage and lack of sanitation on open plots in various parts of city prevalence of mosquitoes has increased in city)

शहादा पालिकेवर सध्या प्रशासकराज आहे. शहराच्या कान्याकोपऱ्यात ठिकठिकाणी घाणीचे ढीग व तुंबलेल्या गटारींमुळे डासांची पैदास वाढली आहे. डासांमुळे नागरिकांना विविध आजारांनी ग्रासले असताना पालिकेच्या मलेरिया विभागाकडून नियमित फवारणी व धुरळणी केली जात नसल्याने डासांची पैदास वाढल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, डासांमुळे शहरातील लाखो लोकांचा आरोग्याच्या प्रश्न उपस्थित होत आहे. शहराच्या विविध प्रभागांमध्ये ठिकठिकाणी शोषखड्डे नसल्याने मोकळ्या भूखंडांवर पाणी सोडण्यात आले आहे. अनेक नळांना तोट्या नाहीत. मोकळ्या मैदानात काटेरी झाडे वाढली आहेत. गटारी उघड्या आहेत. परिणामी डासांची पैदास वाढली असून, नागरिकांना नानाविध आजारांचा सामना करावा लागत असल्याची परिस्थिती आहे.

धुरळणी, फवारणीचा अभाव

डोकेदुखी, अंगदुखी, खोकला, सर्दी व तापाने शहादेकर फणफणल्याचे चित्र आहे. शहादेकरांचे आरोग्य धोक्यात असले तरी पालिकेच्या मलेरिया विभागाला सोयरसुतक नसल्याचे नागरिक सांगतात. मलेरिया विभागाने शहरात नियमित धुरळणी आणि फवारणी करणे क्रमप्राप्त असताना या विभागाचे कर्मचारी दिवसभर असतात कुठे, असा सवाल उपस्थित होत आहे. (latest marathi news)

of dirt in open pits in the Govind Nagar area of ​​the city
Nandurbar Lok Sabha Election : सातपुडा परिसराला लोकसभेत प्रतिनिधित्वाची संधी मिळेल?

पालिकेवर प्रशासकराज असल्याने निदान माजी लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला याविषयी विनंती करणे गरजेचे आहे. विकासकामांचा गवगवा करणाऱ्यांनी शहादेकरांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. घराच्या कान्याकोपऱ्यात, नाले, खुले भूखंड, वाढलेली झुडपे आदी ठिकाणी फवारणी करणे क्रमप्राप्त आहे. हवेतील कीटकांचा नाश करण्यासाठी धुरळणी केली जाते. मात्र मागील अनेक महिन्यांपासून धुरळणी, फवारणीचा पत्ताच नसल्याचे नागरिक सांगतात.

दवाखाने हाउसफुल

शहरातील लहान-मोठे क्लिनिक सध्या रुग्णांनी हाउसफुल दिसून येत आहेत. त्यातच विजेच्या लपंडावामुळे अनेक नागरिकांनी डासांमुळे उन्हाळ्यातही मच्छरदानी वापरायला सुरवात केली आहे. यापुढे भयानक परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी औषध फवारणी करावी, तसेच वेळोवेळी धूर फवारणी करून डास उत्पत्ती असलेल्या जागा त्वरित बुजविण्यात येऊन नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

आरोग्य विभागाला कर्तव्याचा विसर

शहरात डासांनी उच्छाद मांडला आहे. सायंकाळी बाहेर बसणेही दुरापास्त झाले आहे. दर वर्षी विविध साथीच्या आजारांचा फैलाव होतो. त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची जबाबदारी पालिकेच्या आरोग्य विभागाची आहे. संबंधित आरोग्य अधिकारी व यंत्रणेला कर्तव्याचा विसर पडल्यामुळे शहादेकरांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

of dirt in open pits in the Govind Nagar area of ​​the city
Nandurbar Lok Sabha Constituency : भाजपकडे वजनदार नेत्यांचे बळ; कॉंग्रेसकडे सामान्य कार्यकर्त्यांची ताकद

"सायंकाळच्या सुमारास डासांनी संपूर्ण शहरवासीयांना त्रास होतो. दिवसेंदिवस आजारपण वाढत आहे. प्रशासनाकडून करवसुली जशी तत्परतेने केली जाते, त्यासाठी मोहीम हाती घेतली जाते, तशी डास निर्मूलनासाठी का होत नाही? पालिकेवर प्रशासक आहे म्हणून काय झालं? शहरात मोकळ्या भूखंडांवर काटेरी जंगल वाढले आहे. अनेकांकडे शोषखड्डे नसल्याने मोकळ्या जागेत पाणी सोडले जाते, अनेक ठिकाणी नळांना तोट्या नाहीत. गटारी उघड्यावर आहेत. त्यामुळे सर्वत्र डास फैलावत आहेत. या सर्व प्रश्नांकडे प्रशासकांनी लक्ष वेधणे गरजेचे आहे."-ॲड. सरजू चव्हाण, नागरिक

"शहादा शहरात डासांचे प्रमाण वाढण्याचे प्रमुख कारण शहराच्या मध्यभागी असलेल्या पाटचाऱ्या. पाटचारीत हॉटेलमालकांनी आपले वेस्टेज पाणी सोडले आहे व काही भागात गटारीत पाणी सोडल्यामुळे शहरात डास खूप होत आहेत. पाटचाऱ्यांवर उपाय केला तर काही प्रमाणात डास कमी होऊ शकतात."-विनोद जैन, नागरिक

"शहादा शहर अतिशय गलिच्छ शहर म्हणून लवकरच नावारूपाला येईल. जागोजागी कचरा, सांडपाणी गोळा झालेले दिसते. प्रशासनही याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. डास निर्मूलन योजना राबवताना प्रशासन अजिबात दिसत नाही. नागरिकांच्या आरोग्याशी हा खेळ सुरू आहे. स्वच्छता आणि सांडपाणी निर्मूलन झाले पाहिजे. लोकप्रतिनिधींनी आवाज उठविला पाहिजे."-प्रा. ज्ञानी कुलकर्णी, नागरिक, शहाद

of dirt in open pits in the Govind Nagar area of ​​the city
Nandurbar Water Scarcity : अल्प पावसामुळे कळंबू परिसरातील विहिरींनी गाठला तळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com