Nandurbar Water Scarcity : अल्प पावसामुळे कळंबू परिसरातील विहिरींनी गाठला तळ

Nandurbar News : या वर्षी अल्प पावसामुळे आतापासूनच विरिरी, बोअरवेल, नदी-नाल्यांनी तळ गाठल्याने, मुबलक पाण्याअभावी उर्वरित पीक व जनावरांचा चारा वाचवायचा कसा, असे संकट शेतकऱ्यांनपुढे ठोकले आहे.
A base reached for lack of water from a well in Shiwar. In the second photograph, the dried-up vessel of the river Buffalo here.
A base reached for lack of water from a well in Shiwar. In the second photograph, the dried-up vessel of the river Buffalo here.esakal

कळंबू : या वर्षी अल्प पावसामुळे आतापासूनच विरिरी, बोअरवेल, नदी-नाल्यांनी तळ गाठल्याने, मुबलक पाण्याअभावी उर्वरित पीक व जनावरांचा चारा वाचवायचा कसा, असे संकट शेतकऱ्यांनपुढे ठोकले आहे. दिवसेंदिवस विहिरी, बोअरवेलच्या जलपातळीत कमालीची घट होत असल्याने याचा फटका पिकांना बसणार आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाचवायचे कसे असे प्रश्न सध्या शेतकऱ्यांना भेडसावत आहे. (Nandurbar Water Scarcity Wells in Kalambu area reached bottom due to scanty rain)

उन्हाळा उलटण्यास अजून तब्बल तीन महिन्यांचा अवधी आहे. वेळेवर मॉन्सून दाखल झाल्यास ६ जूननंतर पावसाची चाहूल लागते. मात्र मॉन्सून लांबणीवर गेल्यास, शेतकऱ्यांचे सर्वच गणित बिघडते. दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत चालल्याने दर वर्षी पावसाचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे जमिनीत पाण्याची पातळी खालावत आहे. शेती वाचवायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

सध्या बागायती शेतकऱ्यांची भुईमूग, मका, बाजरी, ऊस व चाऱ्याचे पीक वाचविण्यासाठी धडपड सुरू आहे. मात्र ऐन पाणी देण्याच्या तोंडावर विहिरी, बोअरवेलच्या पाण्याची पातळी खालावत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

A base reached for lack of water from a well in Shiwar. In the second photograph, the dried-up vessel of the river Buffalo here.
Nandurbar News : ‘त्या’ व्हायरल छायाचित्राने घडविले ‘एकी’चे दर्शन; डॉ. गावित- पाडवी यांच्या गुप्त भेटीने चर्चांना उधाण

काही शेतकऱ्यांच्या विहिरी, बोअरवेल जेमतेम अर्धा तास चालत असल्याने, पिकांना मुबलक पाणी मिळत नाही म्हणून ऐन हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक केली.

"यंदा भुईमूग पिकास पाणी पुरेल या आशेने मी भुईमूग पिकाची पेहरणी केली आहे; परंतु ऐनवेळस बोअरवेल पूर्ण बंद पडला, म्हणून पीक वाचविण्यासाठी शेजारील शेतकऱ्यांकडून मिळेल त्या वेळात उसनवारीने पाणी घेऊन पीक वाचविण्यासाठी धडपड सुरू आहे. मात्र मुबलक पाण्याअभावी उत्पादनात मोठी तफावत जाणवणार आहे, अशीच परिस्थिती बहुतेक शेतकऱ्यांची असल्याने, पीक वाचविण्यासाठी परिश्रम घेत आहेत."-चेतन शेणपडू बोरसे, शेतकरी, कळंबू (ता. शहादा)

A base reached for lack of water from a well in Shiwar. In the second photograph, the dried-up vessel of the river Buffalo here.
Nandurbar Lok Sabha Election : 9 हजार ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार करणार घरबसल्या मतदान!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com