नंदुरबारच्या तरूणाने बनविला ‘रहस्य'पट 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 December 2019

हिंदीमध्ये अनेक रहस्यपट येऊन गेले आहेत मात्र मराठीमध्ये असा प्रयत्न झालेला नाही. त्यातही वेगळे लोकेशन नवोदित कलाकार आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत हा चित्रपट पूर्ण करण्यात आला आहे.

नंदुरबार : मूळचा सोनेवाडी (ता. शिंदखेडा) येथील असलेल्या नंदुरबारस्थित भावेश पाटील या तरूणाने मराठीतील पहिलाच रहस्यपद असलेल्या ‘रहस्य' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट येत्या ७ फेब्रुवारी २०२० ला महाराष्ट्रातील १५० चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे संपूर्ण चित्रिकरण नंदुरबार जिल्ह्यात सातपुड्याच्या पर्वतराजीत झाल्याची माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक निर्माते भावेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

अवश्‍य वाचा > "मी पुन्हा येईन' पेरू विकायला 

भावेश दिनेश पाटील यांनी फिल्म मेकींग व अॅनिमेशन क्षेत्रातील शिक्षण पुण्याला घेतले आहे. शिक्षण करत असतांना चित्रपटाची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांनी २०१६ पासून बळीराजा, नियत, गेमओव्हर, चाबूक या ४ लघुचित्रपटांची निर्मिती केली. बळीराजा या लघुचित्रपटाला फिल्म फेस्टीवलमध्ये बेस्ट चित्रपट म्हणून पुरस्काराही मिळाला. त्यानंतर त्यांनी मोठया पडद्यावर दिग्दर्शक म्हणून काम करण्याची इच्छा झाल्याने भावेश प्रॉडक्शन या निर्मिती संस्थेतर्फे ‘रहस्य' हा पहिला मराठी चित्रपट बनविला आहे. येत्या ७ फेब्रुवारी २०२० मध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरातील १५० चित्रपट गृहांमध्ये चित्रपट प्रसारीत होणार आहे. या चित्रपटाचे सर्व चित्रिकरण २०१८ मध्ये सुरू करण्यात आले. सुमारे तीस दिवसात सलग शुटींगद्वारे चित्रिकरण पूर्ण करण्यात आले. चित्रपटातील सर्व चित्रकरण हे नंदुरबार जिल्ह्यातच झाले असून तोरणमाळ येथे सर्वाधिक चित्रिकरण झालेले आहे. पुढच्या आठवडयात या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शीत होणार आहे. हा चित्रपट हॉरर असून आजच्या तरूणांविषयी माहिती आहे. 

हेही पहा > "पी. एम. किसान'पासून 70 टक्‍के शेतकरी वंचित

या चित्रपटात ४० टक्के व्हीएफएक्स व ऍनिमेशनचा वापर करण्यात आला असून सर्व मराठी चित्रपट रसिकांसाठी एक नवीन प्रयोग असणार आहे. चित्रपट हॉरर असला तरी संपूर्ण कुटूंबाबरोबर पाहता येण्यासारखा आहे. एक कोटी ३० लाख रूपये खर्च या चित्रपटाला आला आहे. या चित्रपटात चार गाणी आहेत. त्यात सुप्रसिध्द गायक आदर्श शिंदे आणि सुनिधी चव्हाण यांनी गाणे गायीले आहेत. या चित्रपटात सर्व कलाकार नवे आहेत अशी माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक व निर्माते भावेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला. सहायक दिग्दर्शक गिरीश सुर्यवंशी, गिरीश माळी, सोनल जाधव, दिनेश पाटील आदी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nandurbar suspence film bhavesh patil relise februvari