Bharat Jodo Nyay Yatra : आदिवासींची जमीन उद्योगपतींना; राहुल गांधी यांचा आरोप

Bharat Jodo Nyay Yatra : ‘‘आदिवासी हा या देशाचा मूळनिवासी आहे. जल, जंगल आणि जमीन आपली आहे. त्यामुळे ते या देशाचे खरे मालक असताना त्यांना ‘वनवासी’ संबोधून वनवासात पाठविण्याचे काम भाजप करत आहे.
Rahul Gandhi at Nandurbar
Rahul Gandhi at Nandurbar esakal

Nandurbar News : ‘‘आदिवासी हा या देशाचा मूळनिवासी आहे. जल, जंगल आणि जमीन आपली आहे. त्यामुळे ते या देशाचे खरे मालक असताना त्यांना ‘वनवासी’ संबोधून वनवासात पाठविण्याचे काम भाजप करत आहे. जंगलच संपविण्याचे काम भाजप करत असून ते तुम्हाला रस्त्यावर आणत भीक मागायला लावणार आहेत. तुमची जमीन मोठ्या उद्योगपतींना देण्याचे कारस्थान सुरू आहे,’’ असा दावा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज नंदुरबार येथे केला. (Nandurbar Tribal land to industrialists Rahul Gandhi allegations)

त्यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ महाराष्ट्रात दाखल झाली असून त्याअंतर्गत आयोजित केलेल्या ‘आदिवासी न्याय यात्रे’वेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. राहुल गांधी म्हणाले,‘‘अन्यायाचा विरोधात आवाज उठविण्यासाठीच भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून देशातील जनतेला न्यायाची गॅरंटी देण्यासाठी मी येथे आलो आहे.

आदिवासी, दलित, मागास जनतेला त्यांचा हक्क, शेतकऱ्यांना न्याय, महिलांना न्याय, युवा वर्गाला न्याय देण्याची काँग्रेसची गॅरंटी आहे. भाजप सरकार अदानी-अंबानी यांच्यासारख्या २० मोठ्या उद्योगपतींचे १६ लाख कोटींचे कर्ज माफ करते, पण त्यांनी आदिवासी, दलित, शेतकऱ्यांचा एक रूपया तरी माफ केला का? हे सरकार संविधानासोबत सर्वसामान्य जनतेचे अधिकारही संपविण्याचा प्रयत्न करीत आहे.

’’ यावेळी मंचावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि इतर नेते उपस्थित होते. सध्याचे सरकार उद्योगपतींना धार्जिणे असल्याची टीका करताना राहुल गांधी म्हणाले,‘‘मनरेगा योजनेसाठी जितकी तरतूद असले, या सरकारने उद्योगपतींचे तितके कर्ज माफ केले आहे. देशातील ७० कोटी जनतेकडे जितका पैसा आहे, तितका पैसा एकेका उद्योगपतीकडे असताना त्यांचे १६ लाख कोटींचे कर्ज माफ करण्यात आले. (latest marathi news)

Rahul Gandhi at Nandurbar
Rahul Gandhi In Nandurbar: 22 उद्योगपतींचे कर्ज मोदी सरकारने माफ केले; राहुल गांधींचा गंभीर आरोप

भाजपचे सरकार त्यांच्यासाठीच काम करत आहे. एवढेच नव्हे, तर या देशातील बड्या मीडियांचे मालकही मोदींचे मित्र आहेत. त्यामुळेच जल, जंगल किंवा जमिनीचा मुद्दा असो की आदिवासी युवकांचा होणारा अवमान असो, अन्यायाची बाजू कोणीही मांडत नाही.

माध्यमांमध्ये एकतरी आदिवासी आहे का? देशात आदिवासींची संख्या आठ टक्के, दलित १५ टक्के व मागासवर्गीय ५० टक्के आहेत. त्या प्रमाणात त्यांना अधिकार मिळतो का?’’ सर्वसामान्य लोक शिक्षण-आरोग्यावरही खर्च करू शकत नाहीत इतकी महागाई वाढली आहे, असे सांगताना राहुल यांनी, ‘हा अन्याय दूर करण्यासाठी तुमची साथ हवी आहे’, अशी हाकही दिली.

होळी पेटवून आनंदोत्सव

आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारा होळी सण काही दिवसांवर असला तरी राहुल गांधी नंदुरबार येथे आल्यानिमित्त त्यांच्यासाठी सभास्थळी होळी पेटविण्यात आली. होळीचा दांडा पडल्यानंतर एक झटक्यात कापला तर यश मिळते, अशी श्रद्धा असल्याचे काँग्रेसचे नेते के. सी. पडवी यांनी सांगितले. राहुल यांनी एका झटक्यात दांडा कापला. म्हणजेच, नंदुरबारची जागा काँग्रेसला मिळेल, असा संकेत मिळाल्याचे पडवी यांनी सांगितले.

Rahul Gandhi at Nandurbar
Nandurbar News : काँग्रेस रामाचा पुजारी, तर भाजप रामाचा व्यापारी : जयराम रमेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com