Nandurbar News : 7 वर्षे उलटून शेतीसाठी ‘धनपूर’च्या पाण्याची प्रतीक्षा!

Nandurbar News : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रखडलेल्या धनपूर धरणाचे काम अखेर गेल्या सात वर्षांपूर्वीच पूर्ण करण्यात आले आहे.
Water storage in Dhanpur dam.
Water storage in Dhanpur dam.esakal

बोरद : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रखडलेल्या धनपूर धरणाचे काम अखेर गेल्या सात वर्षांपूर्वीच पूर्ण करण्यात आले आहे. या धरणामुळे परिसरातील २७२ हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येणार आहे, मात्र केवळ पाटचारी नसल्यामुळे हे क्षेत्र अद्यापही तहानलेलेच राहिले आहे. बोरद परिसरातील २० ते २५ गावांतील शेतकऱ्यांना या धरणाचा लाभ होणार असल्याचे यापूर्वीच सांगण्यात आले होते. (Nandurbar work of Dhanpur Dam was completed seven years ago but only few villages are benefiting from this dam)

प्रत्यक्षात मात्र आजघडीला मोजक्याच गावांना या धरणाचा लाभ होताना दिसून येत आहे. परिसरातील शेतकरी सुजलाम सुफलाम होण्यासाठी (ता. १) जुलै १९९७ ला नंदुरबार जिल्हानिर्मितीच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी, उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे, पाटबंधारेमंत्री एकनाथ खडसे आदी उपस्थित असताना स्वर्गीय पी. के. पाटील यांनी धरपूर धरणाचा प्रस्ताव त्यांना सादर करून या विषयाला चालना दिली होती.

शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर ‘पाणी’

जून २०१७ पासून या धरणात पाणी साठविण्यास सुरवात झाली. हे धरण पूर्ण झाल्याने बोरद परिसरातील मोड, मोहिदा, कळमसरा, धनपूर, सिलिंगपूर, खर्डी लाखापूर फॉरेस्ट, न्यूबन, छो. धनपूर, राणीपूर इत्यादी गावांतील साधारणतः २७२ हेक्टर शेतजमीनही ओलिताखाली येणार हे स्पष्ट झाले होते.

या परिसरातील शेती बागायती होणार आहे त्यामुळे परिसरातील शेतकरी सुखी आणि समाधानी होईल व त्यांच्या उत्पन्नात भरघोस अशी वाढ होईल हे ठासून लोकप्रतिनिधींकडून सांगण्यात आले होते. परंतु सात वर्षांचा कालावधी लोटला असून, शेतापर्यंत पाणी पोचलेच नाही. (latest marathi news)

Water storage in Dhanpur dam.
Dhule Drought News : शासकीय मदतीपासून बळीराजा ‘वंचित’च; कांदा, मका पीकविम्याची दमडीही खात्यावर जमा नाही

उद्देश असफल

हा परिसर पूर्णपणे आदिवासी भागातील असल्याने सातपुड्यावर राहणारा आदिवासी बंधू त्यांच्या परिसरात झालेला धरणामुळे समृद्ध होईल व शेतातील उत्पन्नवाढ झाल्यावर मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देईल. यासाठी धनपूर धरण हे या परिसरातील आदिवासींच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनेल आणि त्यांच्या जमिनी संदर्भातील पाण्याची समस्या कायमची सुटेल हाच यामागचा उद्देश होता मात्र अजूनही हा उद्देश सफल झाला नाही.

कूपनलिकांच्या पातळीत वाढ

धरणाच्या बाबतीत माहिती घेतली असता या धरणाची लांबी साधारणता ४२२ मीटर असून, उंची २०.१८ मीटर, तर खोली १६० मीटर आहे. पाण्याची पातळी वाढल्यानंतर कमी-अधिक प्रमाणात धरणाचे पाणी निझरा नदीत सोडण्यात येते.

या धरणामुळे परिसरातील कूपनलिकांमध्ये पाण्याची पातळी वाढणार, असे सांगण्यात आले आणि प्रत्यक्षात धरणामुळे परिसरातील काही कूपनलिकांच्या पाण्याच्या पातळीत बरीचशी वाढ झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होत आहे. असे असले तरी बरीच शेतजमीन अजूनही तहानलेलीच आहे.

Water storage in Dhanpur dam.
Dhule Lok Sabha Constituency : गटबाजीत धुळे काँग्रेसही सदा पुढे! उमेदवारीप्रश्‍नी बंडखोरीचे संकेत

२७२ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार

याबाबत स्वर्गीय कॉ. जयसिंग माळी यांच्या नेतृत्वाखालील संघर्ष समितीतर्फे पाटचारीसाठी शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे; परंतु २०२४ उजाडले तरी अद्यापही पाटचाऱ्यांचा प्रश्न सुटलेला नाही.

त्यामुळे धरणाच्या साठलेल्या पाण्याच्या माध्यमातून जमिनीत जेवढे पाणी मुरते, तेवढ्याच पाण्याद्वारे परिसरातील शेतकऱ्यांना आपल्या कूपनलिकांच्या माध्यमातून आपल्या शेतातील पिकांची तहान भागवावी लागत आहे. पाटचारी केली तर ठरल्याप्रमाणे २७२ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार हे मात्र तेवढेच खरे आहे.

नेतृत्व हरपल्याने प्रश्न थंडावला

या धरणासाठी संघर्ष समितीतर्फे वेळोवेळी आंदोलन करणारे जयसिंग माळी यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यामुळे या धरणाच्या पाटचारीबाबतचा प्रश्न सध्यातरी थंडावलाच आहे. त्यामुळे पुढे धरणाबाबत स्थापित संघर्ष समितीतर्फे कुठले नेतृत्व पुढे येते याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागून आहेत.

Water storage in Dhanpur dam.
Dhule News : शिंदखेड्यात फक्त 921 हेक्टरवरील शेतकऱ्यांना बागायती दुष्काळी मदत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com