तळोदा- तालुक्यातील जांभाई येथील रहिवासी आणि सध्या हिंगोली येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ईश्वर ठाकरे यांच्या एका छोट्याशा कृतीने साऱ्यांना भुरळ घातली आहे. सुट्टीनिमित्त मूळ गावी जांभाई येथे आले असता त्यांनी स्वतः हातात कैची घेत गावातील लहान मुलांचे केस कापून आपल्या ठायी असणाऱ्या साधेपणाचे दर्शन घडविले.