तो...आवाज सुपरसॉनिक सुखोईचा ! 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 7 February 2020

विमान सुखरूप परत पोहोचले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. हे विमान कमी उंचीवरुन उडत असल्यास सुपरसानिक बुम या सराव प्रकारात अशा प्रकारे प्रचंड मोठा आवाज होतो.

नंदुरबार ः नंदुरबारमध्ये तिन तासा पूर्वी झालेल्या मोठ्या आवाजाबाबत विमान पडल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली होती. यावरून "सकाळ' ने सत्याची पडताळणी केली असता एटीसी मुंबई व हिंदुस्थान एरोनॉटिकल नाशिक येथून माहिती घेतली सुपरसॉनिक बुम फायटर जेट सुखोई विमान पुणे येथून पुणे नाशिक व नाशिक एचएएलच्या अंडर च्या फ्लाइंग एरिया मध्ये प्रॅक्‍टिससाठी होते. 

नक्की पहा :  जन्मदात्रीलाच घरात डांबले...निवृत्त मुख्याध्यापकाचा प्रताप 
 

नंदुरबार हा भाग नाशिक एचएएल चे फ्लाईंग एरीयामध्ये येतो. आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास नंदुरबार शहरात अचानक मोठ्याने आवाज झाले. आवाजाची तिव्रता मोठी असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले होते. तसेच काही घरांच्या काचा देखील अवाजाने फुटल्या होत्या. तसेच विमान पडल्याची अफवांना देखील उत आला होता. परंतू याबाबत सकाळने आवाजा बाबत नाशिक येथून माहिती घेतली असता सदर विमान सुखरूप परत पोहोचले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. हे विमान कमी उंचीवरुन उडत असल्यास सुपरसानिक बुम या सराव प्रकारात अशा प्रकारे प्रचंड मोठा आवाज होतो. अशीही माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. 
 

आर्वजून पहा :नगरसेवकपदी शिवसेनेच्या निता सोनवणे बिनविरोध 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nandurebar merathi news Supersonic Boom Fighter Jet Sukhoi Aircraft Loud noise in nandurebar