धुळे- शहरालगत अवधान शिवारातील एमआयडीसीतून तब्बल ३०० किलो बनावट पनीर जप्त करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांच्यासह पथकाने शनिवारी (ता. २९) ही कारवाई केली. या बनावट पनीर उद्योगाचे कनेक्शन नाशिकपर्यंत असल्याचे तपासातून निष्पन्न होत आहे.