नाशिक पूर्व : ढिकले आघाडीवर तर सानप पिछाडीवर | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 October 2019

नाशिक पूर्व या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून बाळासाहेब सानप तर शिवसेनेकडून राहुल ढिकले निवडणुकीच्या मैदानात आहेत. नाशिक पूर्व मतदार संघ : पहिली फेरी राष्ट्रवादीचे बाळासाहेब सानप : 3481, भाजपा राहुल ढिकले 4431 पहिल्या फेरीअखेर ढिकले आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे.

नाशिक : पूर्व विधानसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का घटला असला तरी घटते प्रमाण फारसे कमी नाही. त्यामुळे मतदारांचा कौल कुणीकडे? यावरच मतदानाचा निकाल अवलंबून राहणार आहे. या मतदारसंघात मुख्य लढत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशीच राहिली. नाशिक पूर्व या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून बाळासाहेब सानप तर शिवसेनेकडून राहुल ढिकले निवडणुकीच्या मैदानात आहेत. नाशिक पूर्व मतदार संघात पहिली फेरी राष्ट्रवादीचे बाळासाहेब सानप 3481, भाजपा राहुल ढिकले 4431 पहिल्या फेरीअखेर ढिकले आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे.

पहिल्या फेरीअखेर ढिकले आघाडीवर

ऐनवेळी राष्ट्रवादीने विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांनी उमेदवारी देत हुकमी एक्का मतदानाच्या रिंगणात उतरविल्याने निवडणुकीत रंग भरला. मनसेतून भाजपमध्ये गेलेले राहुल ढिकले हे सानपांविरूध्द आले आणि आता नशीब अजमावत आहे. शेवटच्या दोन दिवसांत जात फॅक्‍टरपर्यंत मतदान पोचले असले तरी भाजपचे हक्काचे मतदान नाकारता येणार नाही. या मतदारसंघात टोकाची लढाई झाली, एवढे मात्र नक्की.

पक्षांतराच्या नाट्यामुळे, यंदाच्या निवडणुकीत पूर्व विधानसभा मतदारसंघ सर्वाधिक संवेदनशील ठरला. भाजपने विद्यमान आमदारांचा पत्ता कट करत ऐनवेळी ऍड. राहुल ढिकले यांना प्रवेश देत त्यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे या मतदारसंघातील वातावरण तापले. प्रचार टोकाला गेल्याने अतिशय संवेदनशील परिस्थिती या मतदारसंघात निर्माण झाली होती.

भाजप उमेदवाराचा पराभव पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रतिष्ठेला धक्का देणारा ठरू शकतो, त्यामुळे त्यांनी स्वतः लक्ष घातले. दुसरीकडे भाजपचा मित्रपक्ष असला तरी उपद्रवमूल्य दाखविण्यासाठी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी उमेदवाराच्या संपर्क कार्यालयात हजेरी लावून भाजप व शिवसैनिकांना काय संदेश द्यायचा तो दिला.

मतांची टक्केवारी 

-2009 ः 48.49 
-2014 ः 52.38 
-2019 ः 50.66 
एकूण मतदान : 3,55,188


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik east Maharashtra Vidhan Sabha 2019 Rahul is on the front and Sanap is behind