नाशिक: उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम असताना विजेच्या दुर्घटनांनी हाहाकार माजविला आहे. गुरुवारी (ता. २८) नाशिक व जळगाव जिल्ह्यात वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले आहेत. त्यातील तीन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.