त्र्यंबकजवळ अपघातात मोखाड्यातील शिक्षकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

मोखाडा - नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर विरुध्द दिशेने आलेल्या मॅक्झिमो आणि स्विफ्ट डिझायर कार यांच्या जोरदार धडकेत कार मधील शिक्षक सुरेश ठोंबरे याचे निधन झाले तर त्यांच्या पत्नी सुवर्णा ठोमरे, शांताराम नवसारे, किरण देवरे आणि दिलीप शिंपी हे चारही शिक्षक गंभीर जखमी असून, सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे कळते आहे.

तालुक्यातील मोठ्याप्रमाणावर सरकारी कर्मचारी नाशिक येथे वास्तव्यास असून, दररोज याच रस्त्याने ते ये जा करीत असतात. सध्या जिल्हा परिषदांच्या शाळेच्या वेळा सकाळच्या केल्याने हे शिक्षक नाशिक हुन मोखाडा येथे शाळेसाठी येत होते. याच वेळी सकाळी  ७ वाजेच्या सुमारास 'वाह' हॉटेल जवळ चुकीच्या विरूध्द दिशेने येणाऱ्या मॅक्झिमो आणि स्विफ्ट डिझायर कारची धडक झाली. या अपघातात कारचा चेंदामेंदा होअन मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात सुरेश ठोंबरे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. 

ठोंबरे यांच्या या अपघाती निधनाने तालुक्यातील शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. अतिशय सुस्वभावी, पदवीधर शिक्षक असलेले ठोंबरे हे तालुक्यातील पवारपाडा प्राथमिक शाळेवर कार्यरत होते 

दरम्यान, आठवडा भरात मोखाड्यातील व्यक्तींचे जिल्ह्याबाहेर तिन अपघात झाले आहेत. सात दिवसांपुर्वी नवीमुंबईहुन दुचाकीवर घरी येत असताना अपघातात दोन तरूणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर 25 मार्च रोजी शहापूर जवळ बोलेरो गाडीला झालेल्या अपघातात तीन महिलांचा मृत्युमुखी पडल्या. तर आज नाशिक - त्र्यंबकेश्वर रस्त्यावर सुरेश ठोंबरे या शिक्षकाचा मृत्यू झाल्याने मोखाडा तालुक्यावर आठवडाभरात काळाने घाला घालीत सहा जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nashik mokhada teacher accident deth