नाशिक महापौरपदी सतीश कुलकर्णी..उपमहापौरपदी भिकुबाई बागुल विराजमान

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 November 2019

सोळाव्या महापौरपदी कोण बसणार? याबाबतची उत्सुकता शिगेला पोचली असून आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. कारण   नाशिक महापालिकेच्या महापौरपदी भाजपाचे सतीश कुलकर्णी विराजमान झाले आहेत. तर उपमहापौरपदी भिकुबाई बागुल यांची बिनविरोध निवड  झाली आहे.

नाशिक : सोळाव्या महापौरपदी कोण बसणार? याबाबतची उत्सुकता शिगेला पोचली असून आता याला पूर्णविराम मिळाला आहे. कारण   नाशिक महापालिकेच्या महापौरपदी भाजपाचे सतीश कुलकर्णी विराजमान झाले आहेत. तर उपमहापौरपदी भिकुबाई बागुल यांची बिनविरोध निवड  झाली आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाचही नगरसेवकांनी देखील भाजपाला साथ दिली. त्याचप्रमाणे भाजपाच्या दहाही बंडखोरांनी बंडखोरी मागे घेत भाजपाला पाठिंबा केल्याने भाजपाचा विजयाचा मार्ग सुकर झाला.

उत्सुकता शिगेला पोचली होती

महापालिकेत भाजपकडे बहुमत होते तरी दहापेक्षा अधिक नगरसेवक शिवसेनेच्या गोटात दाखल झाल्याने सोळाव्या महापौरपदी कोण बसणार? याबाबतची उत्सुकता शिगेला पोचली होती. भाजपचे नगरसेवक फुटल्याचा दावा केला जात होता, तरी सभागृहात बहुमत सिद्ध करण्यासाठी पुरेसे बळ असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला. शिवसेनेने बहुमताचा आकडा गाठण्याइतपत नगरसेवक असल्याचा दावा केला होता. दुसरीकडे मनसेसह कॉंग्रेसची भूमिका महत्त्वाची ठरणार असून, नाशिकच्या सत्तेच्या राजकारणाकडे राज्याचे लक्ष लागले होते. 

भाजपकडून ताकही फुंकून पिण्यात आले

महाशिवआघाडीप्रमाणे नाशिकमध्ये देखील शिवसेनेने पुढाकार घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले होते..महापालिकेत भाजपकडे बहुमत होते, पण माजी आमदार बाळासाहेब सानप समर्थक नगरसेवकांनी शिवसेनेची वाट धरल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सत्तास्थापनेच्या खेळात भाजपकडून ताकही फुंकून पिण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik Municipal Corporation Election Nashik News Marathi News