गावाकडच्या विद्यार्थ्यांपर्यंत गुरुजी पोचविणार 'वाघिणीचे दुध'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 मार्च 2018

टॅगद्वारे शिक्षक स्वतःच्या व्यावसायिक विकासासाठी कटिबद्ध होत आहेत.त्यासाठी ब्रिटिश कौन्सिल मार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या मोफत आॅनलाइन इंग्रजी प्रशिक्षणाद्वारे  शिक्षक समृद्ध होत आहे

येवला  - तेजस उपक्रमांतर्गत राजापूर व म्हसोबा वाडी,कुसमाडी येथे टॅग उपक्रम सुरू करण्याचा निश्चय प्राथमिक शिक्षकांनी स्वयंस्फूर्तीने केला आहे.यासाठी नियोजन बैठक देखील पार पडली असून टॅग सुरू करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत गुरुजी वाघिणीचे दुध पोहचवणार आहे.

महाराष्ट्र शासन, ब्रिटिश कौन्सिल व टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेल्या तेजस उपक्रमाचा उद्देश विद्यार्थी व शिक्षक यांमध्ये  इंग्रजी संभाषण कौशल्य विकसित करणे, त्यांचा आत्मविश्वास वाढवणे हा आहे.सोबतच इंग्रजी अध्ययन अध्यापनात पाठ्यपूस्तकातील संवाद,नाट्यरूपातील गोष्टी,स्वतःची व मित्राची ओळख करून देणे,रोल प्ले, चेन ड्रिल अॅक्टिव्हीटी, मुलाखत, पाठ्यपूस्तका व्यतिरिक्त दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या प्रसंगात घडणारे संवाद यासारख्या विविध तंत्रांचा व अभिनव कल्पनांचा वर्गात प्रभावी वापर करणे, एकमेकांचे अनुभव, समस्या याविषयी चर्चेतुन उपाय शोधून विषय सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांसमोर मांडणे, विशेषतः ग्रामीण भागातील पालकांच्या इंग्रजी विषयाबाबत असलेल्या अपेक्षा पूर्ण करणे असा आहे.

टॅगद्वारे शिक्षक स्वतःच्या व्यावसायिक विकासासाठी कटिबद्ध होत आहेत.त्यासाठी ब्रिटिश कौन्सिल मार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या मोफत आॅनलाइन इंग्रजी प्रशिक्षणाद्वारे  शिक्षक समृद्ध होत आहे. 

मागील दोन वर्षांपासुन महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, अमरावती, औरंगाबाद, बीड, गडचिरोली, हिंगोली, नागपूर, यवतमाळ या नऊ जिल्ह्य़ात तेजस उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत आहे. यासाठी एका केंद्रातील 25 शिक्षकांसाठी एका टॅगची म्हणजे टिचर्स अॅक्टीव्हिटी ग्रुपची निर्मिती करण्यात आली. तालुक्यातील प्रत्येकी 3 टॅग साठी एका  टॅग काॅर्डिनेटरची निवड करण्यात आली होती.येवला तालुक्यातील टॅग काॅर्डिनेटर प्रशांत शिन्दे यांनी देशमाने, जळगाव व चिचोंडी हे स्वतः चे  3 टॅग सांभाळून शिक्षकांना प्रेरित करत राजापूर व कुसमाडीचे केंद्रप्रमुख निलेश जाधव व मिना वैद्य यांच्या उपस्थितीत दोन्ही केंद्रात नवीन टॅग सुरू केले. यासाठी  त्यांना प्रादेशिक विद्या प्राधिकरण औरंगाबादचे संचालक डॉ. सुभाष कांबळे व इंग्रजी विभागाप्रमुख डॉ. उज्ज्वल करवंदे,ब्रिटिश कौन्सिलच्या वरिष्ठ शैक्षणिक व्यवस्थापक राधिका घोलकर व समन्वयक (प.बंगाल) प्रिया अय्यर,जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था नाशिकचे प्राचार्य डॉ. रविंद्र जावळे, गटशिक्षणाधिकारी मनोहर वाघमारे व राज्यस्तरीय शैक्षणिक साधनव्यक्ती अशोक चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. राजापूर व कुसमाडी येथील 50 टॅग टिचर्स साठी डि.आय.ई.सी.पी.डी. नाशिक मार्फत टॅग रिसोर्स बुक मोफत उपलब्ध करून देण्यात आले. टॅग सुलभक म्हणून राजापूर केंद्रात शांतीनाथ वाघमोडे तर कुसमाडी केंद्रात चंद्रभान पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांचेसोबत प्रविण विंचु,किशोर गायकवाड, संदिप शेजवळ,गोपाल तिदार, शांताराम काकड, अनिल महाजन, बालाजी नाईकवाडी, काशिनाथ जाधव, मनिषा जंजाळ, रचना गावडे आदी टॅग यशस्वी ते साठी प्रयत्नशील आहेत.याप्रसंगी उर्वरित आठ केंद्रातदेखील असे आवाहन गटशिक्षणाधिकारी मनोहर वाघमारे यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nashik news north maharashtra teacher school