आधी शिक्षकभरती करा, मग अपेक्षा व्यक्त करा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जानेवारी 2018

नाशिक - शिक्षणाविषयी आशा-अपेक्षा व्यक्त करून निरनिराळे प्रयोग करणारे शिक्षणमंत्री मात्र राज्यात शिक्षकभरती करीत नाहीत. निर्णय घेतात, मात्र अंमलबजावणी करीत नाहीत. ‘गोष्टी मोठ्या, कृती शून्य’, असे चित्र राज्यभरात शिक्षकांच्या रिक्त पदांवरून दिसून आले आहे. ही बाब ‘सकाळ’ने मांडताच प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला (ता. २५) बेरोजगार शिक्षकांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या भावना व्यक्त करीत सरकारला जागा दाखविण्याची भाषाच बोलून दाखविली आहे.

‘सकाळ’ने २४ जानेवारीच्या अंकात ‘झेडपी शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त’, असे वृत्त प्रसिद्ध केले होते. यानंतर सोशल मीडियावर बेरोजगार शिक्षकांनी एल्गार पुकारला. बेरोजगार शिक्षकांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ट्‌विटरवर #शिक्षक भरती नावाचा हॅशटॅग सुरू करीत ‘सकाळ’ने शिक्षकपदांसदर्भातील रिक्त जागांचे दिलेले वृत्त टाकले. त्यानंतर बेरोजगार शिक्षकांनी भावना व्यक्त करायला सुरवात केली. 

शाळा डिजिटल करणे, शिक्षण व ज्ञानदानासंदर्भात विविध आदेश काढून अपेक्षा व्यक्त करणाऱ्या शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या विभागात शिक्षणाची काय दुरवस्था झाली आहे, याची प्रचिती येत असल्याचे सांगून ‘शिक्षकभरती करा, मग अपेक्षा व्यक्त करा,’ असा सल्ला देत २०१९ चे उद्दिष्टही त्यांनी शिक्षणमंत्र्यांना दिले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nashik news teacher recruitment school