विनायकदादा पाटील, राम नाईक यांना वाङ्‌मय पुरस्कार 

विनायकदादा पाटील, राम नाईक यांना वाङ्‌मय पुरस्कार 

नाशिक - मराठी भाषा विभागाच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार 2016 आज जाहीर करण्यात आले. यात प्रथम प्रकाशन काव्याचा बहिणाबाई चौधरी पुरस्कार "सकाळ' नाशिक आवृत्तीचे वरिष्ठ उपसंपादक अजित अभंग यांच्या गैबान्यावानाचं या कवितासंग्रहाला, प्रौढ वाङ्‌मय लघुकथा (ललित विज्ञानासह) प्रकाराचा अनंत काणेकर पुरस्कार विनायकदादा पाटील (नाशिक) यांच्या गेले लिहायचे राहून यास, प्रौढ वाङ्‌मय आत्मचरित्र प्रकारात लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार राम नाईक यांच्या चरैवेति ! चरैवेति !! यात तर प्रौढ वाङ्‌मय शेती व शेतीविषयक पूरक व्यवसाय लेखन प्रकारात सकाळ प्रकाशनच्या "तांत्रिक दृष्टिकोनातून सेंद्रिय शेती' या प्रशांत नाईकवाडी यांना वसंतराव नाईक पुरस्कार जाहीर झाला आहे. 

मराठी भाषेतील उत्कृष्ट मराठी वाङ्‌मयनिर्मितीस हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. काव्य , नाटक, एकांकिका, कांदबरी, लघुकथा, ललितगद्य, दलित साहित्य, शिक्षण शास्त्र, बालवाङ्‌मय आदी 34 प्रकारांत विविध लेखक, साहित्यिकांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. मराठी भाषामंत्री विनोद तावडे यांनी आज प्रसिद्धिपत्रकाद्वारे या पुरस्कारांची आज घोषणा केली. 2016 साठीच्या उत्कृष्ट मराठी वाङ्‌मय पुरस्कारासाठी ज्या लेखक व साहित्यिकांची निवड करण्यात आली आहे त्या पुरस्कारार्थींची यादी खालीलप्रमाणे - 


अ.क्र.---वाङ्‌मय प्रकार---पुरस्कार----रक्कम----लेखकाचे नाव----पुस्तकाचे नाव----प्रकाशन संस्था 

1. प्रौढ वाङ्‌मय (काव्य)--- कवी केशवसुत पुरस्कार--- रु. 1,00,000--- दिनकर मनवर---अजूनही बरंच काही बाकी-- पोएट्री प्रिमेरो पेपरवॉल मीडिया अँड पब्लिशिंग प्रा.लि. चे इम्प्रिंट, मुंबई 
2. प्रथम प्रकाशन (काव्य)----बहिणाबाई चौधरी पुरस्कार--- रु. 50,000-- अजित अभंग (वरिष्ठ उपसंपादक, सकाळ)---गैबान्यावानाचं---पोएट्री प्रिमेरो पेपरवॉल मीडिया अँड पब्लिशिंग प्रा.लि. चे इम्प्रिंट, मुंबई. 
3. प्रौढ वाङ्‌मय(नाटक/एकांकिका)--- राम गणेश गडकरी पुरस्कार---रु. 1,00,000--- डॉ. आनंद नाडकर्णी---त्या तिघांची गोष्ट---मॅजेस्टिक पब्लिशिंग हाउस, मुंबई. 
4. प्रथम प्रकाशन (नाटक/एकांकिका)---विजय तेंडुलकर पुरस्कार---रु. 50,000---प्रा. के. डी. वाघमारे---क्षितिजापलीकडे--निर्मल प्रकाशन, नांदेड 
5. प्रौढ वाङ्‌मय (कादंबरी)---हरी नारायण आपटे पुरस्कार--- रु. 1,00,000---सदानंद देशमुख---चारीमेरा---पॉप्युलर प्रकाशन, मुंबई 
6. प्रथम प्रकाशन (कादंबरी)---श्री. ना. पेंडसे पुरस्कार--- रु. 50,000--श्रीरंजन आवटे--- सिंगल मिंगल--राजहंस प्रकाशन प्रा.लि., पुणे 
7. प्रौढ वाङ्‌मय(लघुकथा)---दिवाकर कृष्ण पुरस्कार--- रु.1,00,000---नीलम माणगावे---निर्भया लढते आहे---ग्रंथाली प्रकाशन, मुंबई 
8. प्रथम प्रकाशन (लघुकथा)---ग. ल. ठोकळ पुरस्कार---रु.50,000---दुर्योधन अहिरे--जाणीव-- यशोदीप पब्लिकेशन्स, पुणे 
9. प्रौढ वाङ्‌मय-ललितगद्य (ललित विज्ञानासह)---अनंत काणेकर पुरस्कार--- रु. 1,00,000-- विनायक पाटील-- गेले लिहायचे राहून---राजहंस प्रकाशन प्रा.लि., पुणे 
10. प्रथम प्रकाशन (ललितगद्य)--ताराबाई शिंदे पुरस्कार--रु. 50,000--रश्‍मी कशेळकर--भुईरिंगण---मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, ठाणे 
11. प्रौढ वाङ्‌मय (विनोद)--श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार-- रु.1,00,000--बब्रूवान रुद्रकंठावार---आमादमी विदाऊट पार्टी--जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद 
12. प्रौढ वाङ्‌मय (चरित्र)---न. चिं. केळकर पुरस्कार---रु. 1, 00,000--अरुण करमरकर--पोलादी राष्ट्रपुरुष--स्नेहल प्रकाशन, पुणे 
13. प्रौढ वाङ्‌मय (आत्मचरित्र)--लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार--रु. 1,00,000--राम नाईक---चरैवेति ! चरैवेति!!--इंकिंग इनोव्हेशन्स, मुंबई 
14. प्रौढ वाङ्‌मय (समीक्षा/ वाङमयीन संशोधन/सौंदर्यशास्त्र/ललितकला आस्वादपर लेखन)--श्री. के. क्षीरसागर पुरस्कार-- रु. 1,00,000-- 
विश्राम गुप्ते--- नवं जग, नवी कविता--संस्कृती प्रकाशन, पुणे 
15. प्रथम प्रकाशन (समीक्षा सौंदर्यशास्त्र)---रा. भा. पाटणकर पुरस्कार---रु. 50,000--बाळू दुगडूमवार--बाबा आमटे यांची गीते : आकलन आणि आस्वाद--अभंग प्रकाशन, नांदेड 
16. प्रौढ वाङ्‌मय (राज्यशास्त्र/समाजशास्त्र) ---डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार---रु. 1,00,000---आतिवास सविता-----भय इथले...तालिबानी सावट : प्रत्यक्ष अनुभव--- राजहंस प्रकाशन प्रा. लि. पुणे. 
17. प्रौढ वाङमय (इतिहास)--शाहू महाराज पुरस्कार---रु. 1,00,000--विजय आपटे---शोध महाराष्ट्राचा--राजहंस प्रकाशन प्रा. लि. पुणे--- 
18. प्रौढ वाङ्‌मय (भाषाशास्त्र/व्याकरण)---नरहर कुरुंदकर पुरस्कार--रु. 1,00,000---तन्मय केळकर-- मैत्री सुंस्कृतशी---रोहन प्रकाशन, पुणे. 
19. प्रौढ वाङ्‌मय विज्ञान व तंत्रज्ञान (संगणक व इंटरनेटसह)--- महात्मा जोतिराव फुले पुरस्कार---रु. 1,00,000- डॉ. माधवी ठाकूरदेसाई --प्रकाशवेध---रोजहंस प्रकाशन, पुणे 
20. प्रौढ वाङ्‌मय (शेती व शेतीविषयक पूरक व्यवसाय लेखनासह )---वसंतराव नाईक पुरस्कार रु. 1,00,000---प्रशांत नाईकवाडी--- तांत्रिक दृष्टिकोनातून सेंद्रिय शेती---सकाळ पेपर्स प्रा.लि., पुणे 
21. प्रौढ वाङ्‌मय- (दलित साहित्य लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार)---रु. 1,00,000---प्रा. डॉ. सुरेश चौथाईवाले---मातंग चळवळींचा इतिहास----लहुजी प्रकाशन, औरंगाबाद 
22. प्रौढ वाङ्‌मय (अर्थशास्त्र व अर्थशास्त्रविषयक लेखन)---सी. डी. देशमुख पुरस्कार---रु. 1,00,000---अतुल कहाते--पैसा--मनोविकास प्रकाशन, पुणे 
23. प्रौढ वाङ्‌मय (तत्त्वज्ञान व मानसशास्त्र)---ना. गो. नांदापूरकर पुरस्कार---रु.1,00,000---डॉ. अनिल सहस्रबुद्धे--लोकनिष्ठ अध्यात्मवाद---पद्मगंधा प्रकाशन, पुणे 
24. प्रौढ वाङमय (शिक्षणशास्त्र कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार)---रु. 1,00,000---डॉ. पुरुषोत्तम भापकर---हे शक्‍य आहे!---अवे मारिया पब्लिकेशन्स, पुणे. 
25.प्रौढ वाङ्‌मय (पर्यावरण)---डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार---रु. 1,00,000---प्रा. पुंडलिक गवांदे--- देतो तो निसर्ग, घेतो तो मानव---दुर्वा एजन्सीज, पुणे 
26. प्रौढ वाङ्‌मय (संपादित/ आधारित)--- रा. ना. चव्हाण पुरस्कार---रु. 1,00,000--संपादक डॉ. द. ता. भोसले---रा. रं. बोराडे : शिवारातला शब्द शिल्पकार---अथर्व पब्लिकेशन्स, धुळे 
27. प्रौढ वाङ्‌मय (अनुवादित)---तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार--रु. 1,00,000---अनुवादक जयंत कुलकर्णी--देरसू उझाला--- राजहंस प्रकाशन प्रा.लि., पुणे 
28. प्रौढ वाङ्‌मय- संकीर्ण (क्रीडासह)---भाई माधवराव बागल पुरस्कार---रु. 1,00,000---डॉ. जनार्दन वाघमारे---शरद पवार व्यक्तित्त्व, 
नेतृत्व आणि कर्तृत्व---निर्मल प्रकाशन, नांदेड. 
29. बालवाङ्‌मय (कविता)--- बालकवी पुरस्कार---रु. 50,000---माया दिलीप धुप्पड---सावल्यांच गाव---अमित प्रकाशन, जळगाव 
30 : बालवाङ्‌मय (नाटक व एकांकिका)---भा. रा. भागवत पुरस्कार---रु. 50,000---डॉ. सतीश साळुंके---उदाहरणार्थ--परिवर्तन प्रकाशन, बीड 
31. बालवाङ्‌मय (कादंबरी)--- साने गुरुजी पुरस्कार---रु. 50,000---प्रा. डॉ. जे. एन. गायकवाड---कथा एका महामानवाची---अस्मिता प्रकाशन, सांगली 
32. बालवाङ्‌मय- कथा (छोट्या गोष्टी, परीकथा, लोककथांसह)---राजा मंगळवेढेकर पुरस्कार--रु. 50,000--डॉ. विशाल तायडे--प्राण्यांचा व्हॉट्‌स ऍप आणि इतर गोष्टी---सई प्रकाशन, जालना 
33. बालवाङ्‌मय (संकीर्ण)--- ना. धो. ताम्हणकर पुरस्कार--रु. 50,000---सोनाली गावडे---माझी दैनंदिनी---सृजन प्रकाशन, सांगली 
34. सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार---सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार---रु. 1,00,000---अनिल परुळेकर---काझा पिंतु---अनिल परुळेकर, गोवा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com